सावित्रीबाईं फूले जयंती लोकाभिमुख व्यक्तिमत्वांच्या सन्मानाने साजरी.
◾ग्रमपंचायत नवेगाव पांडव चा स्तुत्य उपक्रम
नागभिड ( राज्य रिपोर्टर ) : क्रान्तीज्योती सावित्रीबाईं फूले यांची जयंती संपुर्ण जिल्हयात उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील नवेगाव ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या सहकार्याने अनेक लोकाभिमुख व्यक्तिंचा सन्मान करून व स्मृतीचिन्हांचे वितरण करून सर्वागसुंदर उपक्रमाचे आयोजन करून जयंती साजरी केली.
या जयंती समारोहाचे उदघाटन राज्य पत्रकार संघाचे विदर्भ् अध्यक्ष महेश पानसे यांनी केले तर अध्यक्षक्षपदी उपसरपंच विजय बोरकुटे हे होते.
सावित्रीबाईंच्या फोटो ला माल्यार्पण व् उदघाटनानंतर सरपंचा शर्मिला रामटेके यांनी प्रास्ताविक करुन विवीध उपक्रमांची रुपरेषा स्पष्ट केली. नेवजाबाई विद्यालय व धर्म्रराव कन्या विद्यालय, जि.प.विद्यालयातील अनेक विदयार्थी व विदयार्थ्यीनिंनी समुहगान व एकांकिका सादर करून सावित्रीबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकला. कर्यक्रमादरम्यान आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वितरणाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी न.प.नागभिड अभियंता सौ.झाडे,शिक्षण विस्तार अधिकारी सौ.भांगरे, वैद्यकीय अधिकारी कु.डॉ.पल्लवी यानी सावित्रीबाईंच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. आपल्या उदघाटनपर भाषणात प्रा.महेश पानसे यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा वारसा पुढे सुशिक्षीत महिलांनी चालवून सेवाभावी जिवन जगण्याचे आवाहन केले. अध्यक्षपदावरून बोलताना विजय बोरकुटे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अनेक सेवाव्रतीचा स्मुतीचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यात नवेगाव पांडव रहिवासी प्रा.महेश पानसे यांचा वर्तमानपत्रातील दिर्घकाल् यशस्वी सेवेसाठी,सरपंच शमिंला रामटेके यांचा उत्कृष्ट कार्यासाठी,शिवाय परिसरातील तलाठी मंगर, वैद्यकीय अधिकारी डाॅ.पल्लवी,मुख्याध्यापक ठाकरे,धर्मराव कन्या विद्यालयाचे अनेक शिक्षक,अंगणवाडी सेविका,ग्रामविस्तार अधिकारी,अशा अनेक सेवाव्रतींचा गावकरी व ग्रामपंचायत तर्फे सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रा.प.सदस्य,गावकरी,ग्रा.प. कर्मचारी,मोठया संख्येनें उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार संचालन ने.हि.विद्धालयाचे शिक्षक श्री.डांगे यांनी केले.






0 Comments