बल्लारपूर काँग्रेस कमिटी द्वारा काँग्रेस स्थापना दिवसाचा कार्यक्रम संपन्न
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर काँग्रेस कमिटी द्वारा काँग्रेस स्थापना दिवसाचा कार्यक्रम आज दिनांक. 28/12/2022 घेण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तैलचित्रला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. त्यानंतर देवेंद्र आर्य यांनी काँग्रेस पार्टी चा स्वतंत्र पूर्वी पासून तर आता पर्यंत चा इतिहासाची माहिती दिली या प्रसंगी नवनिर्वाचित इटोलीचे सरपंच राजेश ढुमने व कटवली बामणी चे सरपंच तुळशीराम पीपरे यांचा शहर काँग्रेस कमिटी द्वारा सत्कार करण्यात आला. तसेच मा.अनिल खडतड व डेव्हिड कॅम्पेल्ली यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
भारत जोडो यात्रेत राजस्थानला जाऊन सलग 8 दिवस यात्रेत सामील झालेले माजी गट नेते देवेंद्र आर्य यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. मा.घनश्याम मूलचंदानी व शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष करिम भाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गोविंदा उपरे,माजी नगराध्यक्ष छाया मडावी, महिलाशहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष ऍड. मेघा भाले ,रेखा रामटेके,वर्षा दानव,एकता चुरे,शांती घुगलोत, सविता वाघमारे, रिटा बेनबन्सी, भास्कर माकोडे,इस्माईल ढाकवाला,नरसिंह रेब्बावार,डॉ .भसारकर,ऍड. पवन मेश्राम,नरेश मुधडा, राजेश नक्कावार,करण कामटे,दुर्गराज आरेकर,मेहमूद भाई पठाण,स्नेहल बडघरे,रवी कोडपे,प्रीतम पाटील ,कार्तिक जीवतोडे,सचिन तोटावर,प्राणेश अमराज, राजू बहुरीया, हेमंत मानकर,महेश सदाला,नागेश मेदर,टिंकू रामिडवार,प्रफुल बपानवर,उमेश शेंडे,तिजारे मामु,आकाशकांत दुर्गे,आफताब भाई,कासीमभाई, मो.अंकुश, फारुखभाई,सादीकभाई व इतर कार्यकर्ते हजर होते.






0 Comments