चंद्रपूर येथे ग्राहकांच्या जनजागृती साठी राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम



चंद्रपूर येथे ग्राहकांच्या जनजागृती साठी राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम

              चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर )राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरावर जिल्हा व तालुका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक जनजागृतीसाठी 24 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय सभागृह, चंद्रपूर येथे राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

              याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुरेंद्र दांडेकर, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या कल्पना जांगडे, जिल्हाध्यक्ष ग्राहक पंचायत परशुराम तुंडूलवार, आनंद मेहरकुरे, सायबर शाखेचे मुजावर अली, सचिन खंडाळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

              या राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाप्रसंगी प्रत्येक व्यक्ती हा जन्मापासून ते मृत्यू होईपर्यंत ग्राहक असल्याने फसवणुकीपासून संरक्षण मिळविण्यासाठी प्रत्येकाने जागृत राहावे व फसव्या जाहिरातींना बळी न पडण्याबाबत अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आवाहन केले.

              यावेळी उपस्थितांना ग्राहक चळवळ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्राहक आयोग रचना, कार्यपद्धती व ग्राहक संरक्षण कायदा-2019 बाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या कल्पना जांगडे यांनी माहिती देत विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच ऑनलाइन शॉपिंग करतांना होणाऱ्या फसवणुकीबाबत व त्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबाबत जिल्हा सायबर शाखेचे मुजावर आली यांनी माहिती दिली.

              कार्यक्रमाचे संचालन पुरवठा निरीक्षक खुशबू चौधरी, तर आभार अव्वल कारकून अर्चना गंग्रस यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तहसील कार्यालय तसेच अन्न नागरी पुरवठा विभागातील इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.





Post a Comment

0 Comments