चंद्रपूर शहर मनपा कार्यालय व शाळांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन




चंद्रपूर शहर मनपा कार्यालय व शाळांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त अभिवादन

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने रविवारी ( ता. २ ) मनपा मुख्यालय आणि जटपूरा गेटस्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आयुक्त विपीन पालीवाल,उपायुक्त अशोक गराटे तसेच महानगरपालिकेतील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
    महानगरपालिका शाळांमध्येही राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच 'भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थ्यांद्वारे महात्मा गांधीजींचे आवडते भजन 'वैष्णव जन तो तेने कहीये' गाण्यात आले. तसेच काही शाळेत विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या विचारावर आधारित एक नाटिका सादर केली. मनपाच्या सर्व शाळांमध्ये स्वच्छता मोहिमेअंतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांद्वारे सर्व शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला.
    याप्रसंगी सहायक आयुक्त विद्या पाटील,कवडू नेहारे,विकास दानव,अनिल बाकरवाले,अरुण कुळमेथे,रमेश डांगे उपस्थीत होते.       


 

Post a Comment

0 Comments