घुग्घुस मार्गावर ट्रकची दुचाकीला जबर धडक एकाचा मृत्यू, 2 गंभीर
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : घुग्घुस मार्गावर चिंचाळा गावाजवळ ट्रक ने दुचाकीला धडक दिल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. संकेत झाडे असे मृतकाचे नाव असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या घटनेची माहिती पडोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. ट्रक चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार डीएनआर कंपनीचा ट्रक हा चंद्रपुरकडे जात होता. अशातच त्याच मार्गाने जाणाऱ्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत संकेत झाडे या युवकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही सिदूर येथील रहिवासी असून पुढील तपास पडोली पोलीस करत आहेत.






0 Comments