बल्लारशाह रेल्वे स्थानकावर एका महिलेचा धावत्या रेल्वेत मृत्यू तर चंद्रपुरातील महाकाली कॉलरी परिसरात अप लाईनच्या रेल्वे रुळावर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह !
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेत एका 38 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहीती आहे. याविषयीच्या अधिक माहितीनुसार शकुंतलादेवी चिंतामण माझी वय 38 वर्षे, रा. केरमा केसरवान, जिल्हा. मुझफ्फरपूर ( बिहार ) ही महिला ट्रेन क्रं. 12792 सिकंदराबाद - दानापूर एक्सप्रेस च्या कोच क्रं. S/9 मध्ये बर्थ क्रं. 74 ने मुझफ्फरपूर ( बिहार ) ला जात असतांना प्रवासादरम्यान बल्लारशाह रेल्वे स्थानकावर बेशुद्धावस्थेत असल्याची आढळून आली. असा लेखी मेमो ऑन ड्युटी डीवायएसएस बल्लारशाह यांनी दिल्या वरुन सदर महिलेला ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर महिलेला मृत घोषित केले.
यावरून रेल्वे पोलिस चौकी बल्लारशाह येथे मर्ग अपराध क्रं. 22/22 क्रं. 174 प्रमाणे नोंद झाला असून मृतकावर योग्य ती कारवाई करण्यासाठी मा. सय्यद अहमद पोऊनी यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा. देवानंद मंडलवार, पोशि. गिरीश शेंदरे, निलेश निकोडे हें करीत आहे.
तर चंद्रपुरातील शहर पोलिस स्टेशन हद्दीतील महाकाली कॉलरी परिसरातील रेल्वेच्या अप लाईनच्या रेल्वे रुळावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहीती आहे. सदर अनोळखी अज्ञात व्यक्ती हा अंदाजित 50 वर्षाचा असून त्यांनी अंगावर पांढरा शर्ट व भुरकट रंगाचा फुल पॅन्ट परिधान केला आहे. या अज्ञात व्यक्तीला कुणी ओळखत असल्यास वा सदर वर्णनाच्या व्यक्तीची ओळख पटल्यास चंद्रपुर शहर पोलिस स्टेशनला संपर्क साधण्याचं आवाहन कऱण्यात आले आहे.









0 Comments