राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा राजुरा व गडचांदूर येथे प्रथम आगमनानिमित्त भाजपा च्या वतीने जाहीर सत्कार
राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा राजुरा व गडचांदूर येथे प्रथम आगमनानिमित्त भाजपा च्या वतीने दि. ०३ सप्टेंबर रोजी जाहीर सत्कार पार पडला.
यावेळी ना. मुनगंटीवारांची लाडूतुला करून दोन्ही शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्याने विकासात मोठी झेप घेतल्याचे सांगितले.
आज त्यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यात विकासाला चालना मिळून विविध क्षेत्रात झपाट्याने विकास होईल असे सांगितले. उपस्थित पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी पक्षीय संघटनेला गती देऊन प्रत्येक क्षेत्रात पक्षाला बळकटी द्यावी असे आवाहन केले. यावेळी सर्वश्री जिल्हाध्यक्ष ग्रा. देवराव भोंगळे, माजी आमदारद्वय संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, अरुण मस्की, मधुकर नरड, सुनील उरकुडे, वाघुजी गेडाम, भाऊराव चंदनखेडे, राजेंद्र डोहे, हरिदास झाडे, वामन तुराणकर, श्रीनिवास पांजा, सचिन डोहे, राधेश्याम अडाणीया, सचिन बैस, लेखन जाधव, आकाश गंधारे, योगेश येरणे, मोहन कलेगुरवार, छाबिलाल नाईक व कोरपना तालुक्यातील नारायण हिवरकर, सतीश उपलेंचवार, महादेव एकरे, शिवाजी शेलोकर, सौ विजयाताई डोहे, महादेव जयस्वाल, हरीश घोरे, संजय मुसळे, नूतनकुमार जीवने, रामसेवक मोरे, अरुण मडावी, मनोहर कुळसंगे, विशाल गज्जलवार, अरविंद डोहे, निलेश ताजने, संदीप शेरकी, प्रतीक सदनपवार, अमोल आसेकर, विजय रणदिवे, रंजनाताई मडावी, सपना सेलोकर, अपर्णा उपलेंचवार, शीतल धोटे यांचेसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.










0 Comments