बामसेफने बुध्दीजिवी वर्गाची निर्मीती केली - मा.डाॅ.कान्हेकर
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : राज्यव्यापी प्रशिक्षण शिबिराच्या अभियानांतर्गत बामसेफ आणि ऑफशुट विंग्जचा एक दिवशी प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. दि.18/09/2022 ला श्री परशुराम सभागृह मूल रोड चंद्रपूर येथे संपन्न झाले.प्रशिक्षक मा.डाॅ.एल. जे.कान्हेकर, CEC BAMCEF होते. अध्यक्षता मा.कविता मडावी राज्य बामसेफ सदस्य यांनी केली.या प्रसंगी बामसेफ मुळे 90 च्या दशकातील राजकीय स्थित्यंतरे फुले-आंबेडकर विचारधारेच्या प्रभावाचे विश्लेषण करतांना मा.डाॅ.कान्हेकर म्हणाले बामसेफ ने या विचार धारेच्या प्रसार व प्रचार केल्याने ब्राम्हणवादाच्या विरोधात समाजाला जागृत करण्यासाठी बुध्दिजिवी कार्यकर्यकर्ते निर्माण केले आणि हि मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले.पुढे भारतीय संविधानाला बायपास करण्याचे आणि बहुजन समाजाचे अधिकार संकुचित करण्याचे व अत्याचाराचे वाढते प्रमाणाच्या विरोधात बिएस-4 अभियान देशव्यापी कार्य हाच निर्माण झालेला बुध्दिजिवी वर्ग करित असल्याचे ठासुन सांगितले. प्रस्ताविक मा.पंकज जांगडेकर जिल्हाध्यक्ष बामसेफ चंद्रपूर यांनी केले.तर संचलन मा.दिवाकर मडावी जिल्हा महासचिव चंद्रपूर यांनी केले.शिबिराचे यशस्वितेसाठी मा.बिंबिसार,मा.सेवकदास,मा.अश्विनी बनसोड, मा. महेंद्र,मा.स्नेहल बनसोड, मा.स्नेहल गोंगले,इ. परिश्रम केले.तर शिबिरात प्रामुख्याने मा.संघा साव, मा.स्नेहा रायपुरे, मा.वनिता भसारकर, मा.दर्शना खोब्रागडे, मा.सविता चांभारे,मा. माया मेश्राम,मा.भारती लोणारे, मा.शारदा खोब्रागडे,मा.वनमाला देवतळे, डि.पी.आत्राम , मा.पि.घुटके,मा.जि.उपरे,मा.सहारे,मा.साव,मा.देवानंद,मा.नरेंद्र राहाटे,इ. विविध संघटणांच्या कार्यकर्त्याने भाग घेतला होता.चाळीसवर कार्यकत्यांचा सहभाग होता.वृत्त-साव सर.









0 Comments