चंद्रपुरातील दाताळा येथील 2 जिवलग मित्र पोहायला गेले असता पाण्यात बुडाले : एकाचा मृतदेह मिळाला तर दुसऱ्याचा शोध सुरु
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : शहरालगत असलेल्या दाताळा गावातील काही मूल रविवार असल्यामुळं पोहायला गेली असता त्यातील दोन मुले गौरव वांढरे, वय 16 वर्षे, व रोहन बोभाटे 17 वर्षे, पाण्यात बुडल्याची घटना आज रविवारी घडली असल्याने दाताळा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दाताळा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मागील भागात असलेल्या नाल्यात पोहायला गेलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पाणी भरपूर प्रमाणात असल्याने मृतदेह शोधण्यास व बाहेर काढण्यास अडचण निर्माण होत आहे, गावकऱ्यांनी प्रशासनाला बोट ची मागणी केली असून मृतदेह बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान सुत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार गौरव चा मृतदेह आढळून आला गौरवचा मृतदेह पाहताच मित्रांनी व कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला विशेष म्हणजे रोहन व गौरव जिवलग मित्र असून एकाच गावातील रहिवासी होते शिवाय दोघेही जिल्हा स्टेडियम समोरील लोकमान्य टिळक विद्यालयाचे वर्ग 10 वी चे विद्यार्थी होते या दुर्दैवी घटनेची माहीती पोलिसांना कळताच रामनगर पोलिस बचाव पथकासह घटनास्थळी पोहोचले व पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.









0 Comments