प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृद्धाश्रमात खाऊ वाटप

 






प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वृद्धाश्रमात खाऊ वाटप



सोलापूर ( राज्य रिपोर्टर ) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ, सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने नुकताच गोविंद वृद्धाश्रमात खाऊ वाटप करण्यात आला.

यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ खंडागळे, आरपीआय आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जयवंत पोळ शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राध्यापक रामलिंग सावळजकर, भाजपा सरचिटणीस प्रकाश चोपडे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे माळशिरस तालुका अध्यक्ष शशिकांत कडबाने, सोलापूर जिल्हा पोलीस मित्रच्या अध्यक्षा विजया कर्णवर, जनसंपर्क अधिकारी माया कदम, समाजसेवक अनिल आवारे, राजू जगताप, रोहित कुंभार प्राध्यापक विनायकराव भगत, प्रा.ओंकार जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गोविंद वृद्धाश्रमाचे प्रमुख दशरथ मोतीराम देशमुख यांचा वृद्धाश्रमासाठी करीत असलेल्या योगदानाबद्दल तर भाजपा सरचिटणीस प्रकाश चोपडे यांचा वाढदिवसानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

यावेळी दशरथ देशमुख यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ वृद्धाश्रमास नेहमीच विविध मार्गाने मदत करीत असतो, असे सांगत वृद्धाश्रम चालवताना येणाऱ्या अडचणी विशद करून सध्याची उपलब्ध जागा पुरत नसल्याने दोन-तीन खोल्या बांधण्याची गरज व्यक्त करून त्यासाठी मदतीचे आवाहन केले. तर प्रमुख अतिथी प्रा. साळवजकर व  जयवंत पोळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments