भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात उदगीर तालुक्यातील शहीद झालेल्या नावाच्या स्तंभाची झाली दुरवस्था प्रशासनाला रंग रंगोटी करण्याचा पडला विसर
उदगीर ( राज्य रिपोर्टर ) : भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात भारत स्वतंत्र करण्यासाठी उदगीर शहरासह तालुक्यातील अनेक शूरवीरांनी आपला या लढ्यात सहभाग नोंदवून या स्वातंत्र्यलढ्यात शहीद झाले. परंतु भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव देशात सर्वत्र उत्साहाने साजरा झाला असताना मात्र उदगीर शहरातील मुख्य रस्त्यावरील जय जवान चौक व शहर पोलीस स्टेशन समोरील मुख्य रस्त्याच्या कडेला शहरासह तालुक्यातील शूरवीरांनी स्वातंत्र्यासाठी लढा देऊन देश स्वतंत्र झाला या शूरवीरांची नावे या स्तंभावर कोरली गेली व दोन्ही ठिकाणी स्तंभाच्या बाजूस लोखंडी ग्रील आहे परंतु या शूरवीरांच्या तिरंगा स्तंभाच्या रंग लुप्त पावला असून ते नावालाच स्तंभ राहिले असून लोखंडाचे गोल वर्तुळ गंजून गेले असून हा अमृत महोत्सव खूप मोठ्या थाटामाटाने देशात साजरा करण्यात आला.
मात्र या अमृत महोत्सवी प्रसंगी स्वतंत्र लढ्यातील स्तंभाचे सुशोभीकरण करण्याचा प्रशासनाला विसर पडला मात्र आज स्तंभाचे निरीक्षण उदगीर येथील बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर दापकेकर व शिक्षक तथा मुक्तपत्रकार बालाजी सुवर्णकार यांनी निरक्षण केले या स्तंभाचे किमान मराठवाडा मुक्ती दिनाच्या आत या स्तंभाचे प्रशासन जागृत होऊन या स्तंभाचे सुशोभीकरण करेल काय अशी उत्सुकता सामाजिक कार्यकर्ते सुधाकर दापकेकर व बालाजी सुवर्णकार यांच्या सह उदगीर तालुक्यातील जनतेला लागली आहे.








0 Comments