कोरपना मौजा परसोडा येथील अतिक्रमण हटवा

 






कोरपना मौजा परसोडा येथील अतिक्रमण हटवा 

कोरपना ( राज्य रिपोर्टर ) : तलाठी साज्या पारडी अंतर्गत येणार मौजा परसोडा येथे शासकीय जागा सर्वे नंबर 134 यावर नांदा येथील श्री. गजानन गंगाराम वनकर यांनी सन 2021 पासून हजारो वृक्षांची तोड करून जवळपास एकूण 30 ते 32 एकर जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार व निवेदन श्री. कार्तिक गोनलावार यांनी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ओम पवार यांच्याकडे केली त्या अनुषंगाने ओम पवार यांनी तहसीलदार कोरपणा यांच्याकडे संबंधित विषयावर तक्रार देऊन सदर मौजा परसोडा येथील शासकीय जमिनीवरील सर्वे नंबर 134 यावरील गजानन गंगाराम वनकर यांचे अतिक्रमण हटवा अशी मागणी केली. गजानन गंगाराम बनकर यांनी अतिक्रमण केल्यामुळे मौजा परसोडा येथील जनावरांना चराऊ चाऱ्यासाठी इतरत्र जागा उपलब्ध नाही याकडेही ओम पवार यांनी तहसीलदार यांचे लक्ष वेधले. यावेळेस पवार यांच्यासोबत संदीप जी टोंगे, अनिल जी कौरासे, विलास भाऊ पारखी, कार्तिक गोनलावार आदी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments