नगरपालिकेने प्रत्येक कर धारक कुटुंबाला ओला आणि सुका कचरा संकलनासाठी मोफत डस बिन चे वाटप करावे.

 





नगरपालिकेने प्रत्येक कर धारक कुटुंबाला ओला आणि सुका कचरा संकलनासाठी मोफत डस बिन चे वाटप करावे.  

 आरमोरी ( राज्य रिपोर्टर ) :   स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना नगरपालिकेकडून केल्या जात आहेत मात्र, सर्वेक्षणात ओला वा सुका कचरा फुटपाथ विक्रेत्यांनी, व्यावसायिकांनी, नागरिकांनी, घरातून वेगळा करून देण्याबाबत निर्देशे दिले आहेत. परंतु आरमोरी शहरातील कचरा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत आहे नगरपरिषेकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबविल्या जात असल्या, तरी पालिकेला सामान्य नागरिकांकडून अपेक्षित पणे ओला आणि सुका कचरा अलग करून मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

 ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण पार पाडता यावे यासाठी शहरातील प्रत्येक कर धारक कुटुंबाला ओला आणि सुका कचरा जमा करण्याकरिता नगरपरिषदेने मोफत डस बिन चे मोफत वाटप करावे. 

 त्याचप्रमाणे शहरातील व्यापाऱ्यांना, छोटे-मोठे दुकान आणि पान टपरी चालकांना सुद्धा डसबीनचे वाटप करण्यात यावे. त्याचबरोबर ओला कचरा आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण कसे करायचे यासंबंधी मार्गदर्शन सूचना द्यावे त्यामुळे दारात येणाऱ्या घंटागाड्यांच्या कर्मचाऱ्यांचा वर्गीकरण साठी लागणारा वेळ वाचेल आणि कचरा इतरत्र टाकण्यापेक्षा नागरिक त्या दिलेल्या डस बिन मध्ये टाकतील. मेंन मार्केट च्या भागातुन दररोज दोनदा सफाई करावी.

 त्यासोबतच नगरपालिकेने काही घंटागाड्या चे पत्रे जीर्ण झाल्याने किंवा भंगारले असल्याने त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी घंटागाडी टाकलेला कचरा हा खाली पडत असून रस्त्यावर पसरत असतो त्यामुळे तात्काळ त्यांची दुरुस्ती करावी.  अशी मागणी नगरसेवक मिलींद खोब्रागडे यांनी पत्रकातुन केलेली आहे.




Post a Comment

0 Comments