बल्लारपूर पोलिस स्टेशन मध्ये पार पडली शांतता समितीची बैठक

 





बल्लारपूर पोलिस स्टेशन मध्ये पार पडली शांतता समितीची बैठक 

◾गणेशोत्सव साजरा करतांना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवावे, कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे - मा. अरविंद साळवे पोलिस अधिक्षक  


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : मागील 2 वर्षात कोरोना संक्रमण असल्यामुळे अनेक सण उत्सवावर अनेक निर्बंध लादण्यात आले होते मात्र सद्यस्थितीत कोरोना परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे शासनाने सर्व सण उत्सवावरील निर्बंध मागे घेतल्यामुळे सण उत्सव उत्साहात साजरे होणार आहे तसेच यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा कऱण्यात येत आहे.

 या पार्श्वभूमीवर आगामी काळात गणेशोत्सव साजरा होणार आहे उत्सव साजरे करतांना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे तसेच गणेशोत्सव साजरा करतांना देशभक्तीपर देखावे तयार करून नागरिकांच्या मनात देशभक्तीची भावना रुजवावी असे आवाहन चंद्रपुर जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अरविंद साळवे यांनी बल्लारपूर पोलिस स्टेशन मध्ये पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीत केले. या बैठकीला मा.दीप्ती सूर्यवंशी पाटील उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर,मा. राजा पवार उपविभागीय पोलिस अधिकारी राजुरा, मा. कांचन जगताप तहसीलदार बल्लारपूर, जयवन्त काटकर, उपमुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, उमेश पाटील पोलिस निरीक्षक बल्लारपूर, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, देवेंद्र आर्य, निलेश खरबडे, सुभाष ताजने, अनेकेश्वर मेश्राम ई ची  उपस्थिती होती. 

यावेळी उपविभागीय अधिकारी दीप्ती सूर्यवंशी पाटील यांनी सभेला मार्गदर्शन करतांना प्रशासन आपल्याला सर्वतोपरी मदत करेल सण उत्सव साजरे करतांना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करा व सामाजिक सलोखा जोपासा असे आवाहन केले यावेळी मा.कांचन जगताप तहसीलदार बल्लारपूर, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांनीही मनोगत व्यक्त केले या सभेला गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, डीजे साउंडचे संचालक, बँड पथक, मूर्तिकार, पोलिस पाटील, पत्रकार व नागरिकांची उपस्थिती होती. या सभेचे प्रास्ताविक उमेश पाटील पोलिस निरीक्षक बल्लारपूर यांनी तर संचालन श्रीनिवास सुंचूवार व आभार प्रदर्शन सपोनि चेतन टेम्भूर्णे यांनी केले.



Post a Comment

0 Comments