बल्लारपूर तालुक्यातील विसापुर गावा लगत बिबट्या वन्यप्राणी जेरबंद वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला यश.
◾वन विभागाने बिबट्याची हालचाल ठिकाणी 4 CCTV कॅमेरे, 4 ट्रॅप कॅमेरे व 3 पिंजरे लावण्यात आले.
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : आज बल्लारपूर तालुक्यातील विसापुर गावा लगत रात्रौ 8.00 चे सुमारास एक बिबट वन्यप्राणी जेरबंद करण्यात आले.
विसापुर गावा लगत असलेल्या महापारेषण च्या परिसरात एक बिबट वन्यप्राणी धुमाकुळ घालत असल्याने विसापुर येथील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तालुका क्रिडा संकुल, विसापुर ला लागुन असलेल्या सिमेंट कॉक्रीट रोडने विसापुर येथील नागरीक व पेपर मिल, बल्हारशाह येथे कामगावर या मार्गाचा अवागमना करीता वापर करीत असतांना त्यांना बिबट या वन्यप्राण्याचे दर्शन होत होते व महापारेषणच्या पडक्या इमारतीवर बिबट वसुन असल्याचे सुध्दा नागरीकांना दिसुन आले होते.
बल्लारपूर वन परिक्षेत्रातील विसापूर गावाच्या हद्दीतील जुन्या पावर हाऊस, बल्लारपुर काही दिवसा अगोदर दिवसा देखील बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले होते. यामुळे जिवहाणी होण्याची शक्यता बळावली होती. नागरिकात भीतीचे वातावरण पसरले होते. गावाकऱ्यांनी बिबट जेरबंद करण्याची मागणी वन विभागाकडे केली होती. याची दखल घेऊन मध्य चांदा वन विभाग चंद्रपूर च्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी शासनाकडे बिबट जेरबंद करण्याची मंगळवारी परवानगी मागितली. शासनाकडून परवानगी मिळताच त्यांनी सभा घेऊन बिबट जेरबंद करण्याचे निर्देश बल्लारपूर वन परिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना दिले.
तसेच सदर बिबट वन्यप्राणी पेपर मील जुनी वसाहत, बल्हारपुर येथे सुध्दा धुमाकुळ घालत होता. सदर परिसरात मानव व वन्यजिव संर्घष निर्माण होवुन अनुचीत घटना घडु नये म्हणुन बिबट या वन्यप्राणाला जेरबंद करुन इतरत्र सोडण्याबाबत नागरीकांची मागणी होत होती.











0 Comments