बल्लारपुरातील बस स्थानकासमोरील हायमोस्ट मागील कित्येक दिवसापासून बंद
◾ संबंधित विभागाचं दुर्लक्ष
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यातील क्रमांक 2 चे शहर म्हणुन ओळखलं जाणार बल्लारपूर शहर येथे संबंधित विभागाचं दुर्लक्ष ( प्रशसनाचे दुर्लक्ष ) मुळे बसस्थानकाच्या अगदी समोर असलेला हायमोस्ट लाईट मागील अनेक दिवसापासून बंद अवस्थेत आहे.
बसस्थानकातून बस बाहेर निघणाऱ्या प्रवेश द्वारा समोर असलेला हायमोस्ट लाईट बंद असल्यामुळं नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो शिवाय प्रशासनाचे अनेक अधिकारी या मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करीत असतांना त्यांच्या निदर्शनास ही बाब येत नाही का? शिवाय रात्रीच्या वेळात अंधार असल्यामुळं लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सबब बाब लक्षात घेवून संबंधित विभागाने या बसस्थानकासमोरील हायमोस्ट लाईट ची दुरुस्ती त्वरित करावी अशा प्रकारची मागणी नागरिकांनी केली आहे.










0 Comments