राजुरा तालुका प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम

 







राजुरा तालुका प्रशासनाच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम

 राजुरा ( राज्य रिपोर्टर ) : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाले जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने संदर्भीय परिपत्रानवये ''स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'' अंतर्गत दिनांक 9 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये राज्यात "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत विविध उपक्रम /कार्यक्रम राबविण्यात आले. 

राजुरा तालुका प्रशासना तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी ओम साई राम सभागृह राजुरा येथे आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमास तहसीलदार श्री. हरीश गाडे, वन उप विभागीय अधिकारी  श्री. गर्कल, संवर्ग विकास अधिकारी श्री.भिंगारदिवे, तालुका कृषी अधिकारी श्री. चव्हाण ,नायब तहसीलदार श्री. अतुल गांगुर्डे, डॉ.विनोद डोणगावकर,श्रीचिंगलवार ,श्री. ओरगंटीवार तसेच तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, विविध राजकीय पक्षाचे अध्यक्ष ,पत्रकार आदी उपस्थित होते. तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमात राजुरा शहरातील ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री प्रायमरी स्कूल राजुरा ,आदर्श हायस्कूल राजुरा,महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा, सोनिया गांधी इंग्रजी शाळा राजुरा, जिजामाता कन्या माध्यमिक विद्यालय राजुरा, शिवाजी हायस्कूल राजुरा, स्टेला मॉरिस शाळा राजुरा, इन्फंट् स्कूल राजुरा, जि. प. हायस्कूल राजुरा, न्यू इरा इंग्लिश स्कूल   राजुरा, गोपीका बाई सांगडा पाटील विद्यालय राजुरा, अड.कनिष्ठ महाविद्यालय राजुरा, शिवाजी महाविद्यालय राजुरा इत्यादी विविध शाळा/ महाविद्यालय विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभाग घेतला. सदर सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतलेला शाळा विद्यालय /महाविद्यालय यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या रांगोळी स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या स्पर्धकांना देखील सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मोहनदास मेश्राम, श्री. गोविंद झाडे, सौ.घोडेश्वर तर प्रस्तावना श्री. अतुल गांगुर्डे तहसीलदार राजुरा यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीमती. सोनाली लांडे यांनी केले.



Post a Comment

0 Comments