तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमातील विद्यार्थांच्या निकालात दुरुस्ती करा - आ. किशोर जोरगेवार

 






तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमातील विद्यार्थांच्या निकालात दुरुस्ती करा - आ. किशोर जोरगेवार

◾उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदनाच्या माध्यमातुन मागणी

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : तंत्रशिक्षण पदविका ( पॉलिटेक्निक ) अभ्यासक्रमातील विद्यार्थांचे उन्हाळी २०२२ परीक्षेचे मौखिक, प्रात्यक्षिक, अंतर्गत आणि लेखी परीक्षेचे गुण एकत्रितरीत्या ग्राह्य धरून निकालात दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची मुंबई येथे भेट घेत केली आहे. यावेळी सदर मागणीचे निवेदनही आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. चंद्रकांत दादा पाटील यांना दिले आहे.

   महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ मुंबई तर्फे घेण्यात आलेल्या तंत्रशिक्षण पदविका ( पॉलिटेक्निक ) अभ्यासक्रमाचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. परंतु यामध्ये बहुतांश विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहे. कोविड महामारीमुळे शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले आहे. आणि परीक्षा मात्र लेखी स्वरुपात घेण्यात आली असल्याने बहुतांश विद्यार्थी उनुतीर्ण झाले आहे.

   कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर पॉलिटेक्निक विद्यार्थाचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने झाले असून लेखी परीक्षाचे कुठलेही सराव नसल्याने लेखी परीक्षा देणे विद्यार्थांना अवाक्याबाहेरचे झाले आणि त्यामुळे बहुतांश विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहे. परिणामी निकाल फक्त २५-३० टक्के ईतकाच लागलेला आहे.

 खराब निकाल लागल्यावर राज्यातील पुणे, नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांनी विद्यार्थांचे भवितव्याचे व तत्कालीन परिस्थितीचा विचार करून परीक्षेचे मौखिक, प्रात्यक्षिक, अंतर्गत आणि लेखी परीक्षेचे गुण एकत्रितरीत्या ग्राह्य धरून निकालात दुरुस्ती करून कंबाइन पासिंग जाहीर केले आहे. याच प्रमाणे आता महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ मुंबई ने हि पॉलिटेक्निक विद्यार्थांच्या भविष्याचा विचार करून परीक्षेचे मौखिक, प्रात्यक्षिक, अंतर्गत आणि लेखी परीक्षेचे गुण एकत्रितरीत्या ग्राह्य धरून निकालात दुरुस्ती करून कंबाईन पासिंग जाहीर करावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातुन आ. जोरगेवार यांनी ना. चंद्रकांत दादा पाटील यांना केली आहे.




Post a Comment

0 Comments