इंद्रकुमार मेघवाल यांच्या हत्यारांना आणि बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या - रिपब्लीकन संघर्ष समिती बल्लारपूर

  





इंद्रकुमार मेघवाल यांच्या हत्यारांना आणि बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या -  रिपब्लीकन संघर्ष समिती बल्लारपूर

◾रिपब्लीकन संघर्ष समिती बल्लारपूर तर्फे इत्यादी मागणी करण्यात आली !


बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : राजस्थान राज्यातील जालोर येथील सुराना गावातील खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या इंद्रकुमार मेघवाल या नऊ वर्षीय दलित विद्यार्थ्याने 20 जुलै 2022 रोजी शिक्षकाचे माठातील पाणी पिल्याचे कारणावरून मुख्याद्यापक छैलसिंग यांनी अस्पृश्यतेच्या कारणावरून सदर विद्यार्थ्याला मरेपर्यंत बेदम मारहाण केली गंभीर दुखापतीमुळे स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सव प्रसंगी 13 ऑगस्ट 2022 रोजी इंद्रकुमार मेघवाल यांचे दुखद मृत्यु झाला. 

तसेच गुजरात राज्यात 2002 साली गोधरा दंगलीमध्ये मुस्लीम भगीनी बिल्कीस बानो या गर्भवती महिलेवर जातीयवादानी जाहिररित्या बलात्कार करून त्यांचे परिवारातील 7 इसमांची हत्या करण्यात आली. 

या प्रकरणातील जन्मठेपेची शिक्ष भोगणा या 11 आरोपींना गुजरात सरकारने स्वातंत्रदिनाचे मुहुर्तावर जन्मठेपेची शिक्षा रद्द करून त्यांची सुटका करण्यात आली. एवढेच नव्हेतर बलात्कार व खुन करणाऱ्या गुन्हेगारांचा जाहीर करण्यात आल्याची माहीती आहे. संविधानाचे कलम 17 नुसार अस्पृष्यता नष्ट करण्यात आली आणि स्त्रीयांना सन्मान दिला असला, तरी स्वातंत्र्याचे 75 वर्षाच्या अमृत महोत्सव प्रसंगी मानवतेला कलंकीत करणाऱ्या क्रूर व पाशवी घटना घडत आहे. 

या घटनेचा रिपब्लीकन संघर्ष समिती बल्लारपूर तर्फे देशाचे राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रोपदी मुर्मु , पंतप्रधान माननिय श्री. नरेन्द्र मोदी, गृहमंत्री माननिय श्री. अमित शाह याना बल्लारपूर च्या तहसिलदार श्रीमती डॉ. कांचन जगताप यांचे मार्फत निवेदन पाठवून इंद्रकुमार मेघवाल यांचे मारेक यांना तसेच गुजरात येथील बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपीना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच  अन्यायग्रस्त कुटूंबातील परिवारांना पोलिस संरक्षण देवून इंद्रकुमार मेघवाल यांचे कुटूंबास 50 लाख रुपये अनुदान सरकारतर्फे दिले पाहिजे इत्यादी मागणी करण्यात आली. 

शिष्टमंडळात समितीचे संयोजक श्री.भारत थुलकर, श्री.संजय डुबेरे, श्री.गुणरत्न रामटेके, श्री.अजय चव्हाण, समता सैनिक दलाचे श्री.रामचंद्र रायपुरे, श्री.भाऊराव सोनटक्के, श्री.ईश्वर देशभ्रतार, श्री.अनिल उमरे, श्री.नागोराव हुमने, श्री. दिलीप मुन, श्री.प्रभाकर रंगारी, श्री.बाबुराव अलोने, श्री.अरुण घायवन, श्री.प्रकाश घायवन, श्री.कैलास झाडे, श्रीमती.वत्सला तेलंग, श्रीमती.ताईबाई फुलझेले. श्रीमती. विमलताई ब्राम्हणे, सौ.सुनिता कांबळे, सौ. मिना रिंगने, सौ. वनमाला भसारकर, श्रीमती शेवंताबाई सातपुते, श्रीमती. बबीता गणविर, श्रीमती. लता गेडाम इत्यादींच्या नेतृत्वात निवेदन सादर करण्यात आले.





Post a Comment

0 Comments