स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव : बल्लारपुरात मुख्य शासकीय कार्यक्रमासह अनेक ठिकाणी राष्ट्रध्वज फडकला
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बल्लारपूर शहरात उत्साह ओसंडून वाहत होता पावसाची रिपरिप सुरू असतानाही देशभक्तीचे चित्र दिसत होते.
या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय कार्य्रक्रम सकाळी 9:15 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला यावेळी ध्वजारोहण मा.दीप्ती सूर्यवँशी-पाटील, उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांच्या हस्ते पार पडले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन मा.डॉ. कांचन जगताप, तहसीलदार बल्लारपूर, मा.अजित कुमार डोके, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, मा.उमेश पाटील पोलिस निरीक्षक बल्लारपूर, मा. किरणकुमार धनावडे गट विकास अधिकारी बल्लारपूर, अनेक राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, पोलिस दल, पत्रकार, शासकीय-निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय बल्लारपूरच्या संयुक्त माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन कऱण्यात आले होते. "रक्तदान श्रेष्ठदान" या भावनेतून अनेक नागरिकांनी रक्तदान केले होते.
नगर परिषद बल्लारपूरच्या प्रांगणात सकाळी 10:05 मिनिटांनी मा. अजित कुमार डोके, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, घनश्याम मुलचंदानी, दिलीप माकोडे, छायाताई मडावी, डॉ.रजनी हजारे यांच्या सह अनेक राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, पोलिस दल, पत्रकार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी नगर परिषदेच्या विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती राष्ट्रध्वजाला पोलिसांनी सलामी दिली, सकाळी 10:35 मिनिटांनी बल्लारपूर शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यावर मा. जयवन्त काटकर उपमुख्याधिकारी, नगर परिषद बल्लारपूर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
यावेळी अनेक मान्यवरांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय बल्लारपूर येथे मा.नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग बल्लारपूर येथील उपअभियंता श्री. नितीन मुत्यालवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. शाखा यावेळी अभियंता वैभव जोशी,श्री. तेजस झाडे CEA, अभियंता श्रीमती क्रांती नागापुरे, अभियंता अंकित कानपिल्लेवार, श्री.भोंगाडे काका,श्रीमती चित्राताई उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने बल्लारपूर शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे श्री.चंदन सिंह चंदेल पूर्व वन विकास महामंडल अध्यक्ष,माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा,माजी नगरसेवक, भाजपा पक्षाच्या विविध विभागाचे नेते व कार्यकर्ते तसेच व्यापारी बांधव उपस्थित होते. बल्लारपूर शहरातील गांधी चौक येथे बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीचे पूर्व शहर अध्यक्ष श्री. पानमल खटोड यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी घनश्याम मुलचंदानी, दिलीप माकोडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विविध विभागाचे नेते व कार्यकर्ते तसेच व्यापारी बांधव उपस्थित होते यासोबतच बल्लारपूर शहरातील जयभिम चौक परिसरातील भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरात राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. पोलिस स्टेशन बल्लारपूर मध्ये मा.उमेश पाटील पोलिस निरीक्षक बल्लारपूर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या शिवाय बल्लारपूर शहरातील अनेक शाळा-महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, अनेक राजकीय पक्षांची कार्यालये, व्यापारी संघटना, विविध सामाजिक संघटना ई नी आप-आपल्या कार्यालयात राष्ट्रध्वज फडकावून सलामी दिली या निमित्ताने बल्लारपूर शहरातील राष्ट्रीय स्मारक ( राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज ) विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाली तसेच विविध शासकीय कार्यालयावरही विद्युत रोषणाई कऱण्यात आली होती.














0 Comments