बल्लारपूर शहरात काँग्रेस तर्फे तिरंगा पदयात्रा

 





बल्लारपूर शहरात काँग्रेस तर्फे तिरंगा पदयात्रा 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या निर्देशानुसार शहर काँग्रेस कमेटी तर्फे तिरंगा यात्रा काढण्यात आली. या रॅलीचे आयोजन शहर काँग्रेस अध्यक्ष अब्दुल करीम यांनी केले. शहरातील वस्ती विभागातून तिरंगा यात्रेची सुरवात करण्यात आली.

 जरा " याद करो कुर्बानी "  हा पक्षातर्फे स्लोगन देण्यात आला होता. तिरंगा यात्रे मध्ये माजी पालकमंत्री (आमदार) विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात तसेच राजूरा आमदार सुभाषभाऊ धोटे, वरोरा आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतले, नंदू नागरकर इत्यादी शामिल झाले. 

कॉलरी गेट ते महात्मा गांधी पूतळ्यापासून गोल पूलीया, नविन बस स्टॅड, जुना बस स्टॅड, नगर परिषद चौका मध्ये समापन करण्यात आली. यावेळी सभा घेण्यात आली. या  सभेमध्ये मा.विजयभाऊ वडेट्टीवार ह्यांनी मार्गदर्शन केले, त्यांनी म्हटले की, या देशासाठी काँग्रेस ने या देशाला इंग्रजाच्या गुलामीतून मुक्त केले. त्या मध्ये काँग्रेस पक्षाच्या नेत्यानी बलीदान दिले. त्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता इंग्रजांशी लढले व आंदोलन केले व हा देश स्वातंत्र केले व या देशाच्या विकासा मध्ये काँग्रेस चे खूप मोठे योगदान आहे. यावेळी आ.सुभाष धोटे, आ.प्रतीभाताई धानोरकर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवतले, नंदू नागरकर, घनश्याम मूलचंदानी आदिंनी भाषने केली. आयोजक शहर काँग्रेस कमेटी शहर अध्यक्ष अब्दुल करीम,मंच संचालन नरेश मुंधडा यांनी केले यावेळी प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष छाया मडावी,सुनंदा आत्राम,अफसाना सैय्यद, डॉ. मधुकर बावणे,देवेन्द्र आर्य,भाष्कर माकोडे, विनोद बुटले, व्यंकटेश बालबैरया, ताहीर हुसेन, इस्माईल ढाकवाला, जावेद सिद्दीकी, रेखा रामटेके, अनिल वाढई,डॉ.भसारकर, पवन मेश्राम, निशांत आत्राम, रोहीदा ताजूद्दीन, राजू बहूरीया, मिना बहूरीया, वर्षा दानव, डॉ.सुनिल कुल्दीवार, विल्सन बोज्जा, शोभा मेहतो, आनंद विरया,डेव्हीड कामपेल्ली, दौलत बुंदेल, सुयोग खोब्रागडे, सुरेश चौधरी, अजय पाटील, राजेश नक्कावार, रवि मातंगी, सचिन तोटावार, गोविंदा उपरे,अखील गेडाम,सुरेश चहारे,विलास राजूरकर,वासूदेव येरगूडे,प्रशांत नेवारे,अजय ढोढरे,दुर्गराज आरेकर,सत्यशिला साळवे,लता घुंगरुटकर,सुरेश बोप्पनवार,गौरव परसूटकर,टिंकू मिलमिले, करण कामटे,विनोद माकोडे,सादिकभाई,हरीश पवार,नागेश मेडर,महेंद्र जंजर्ला,राजू निषाद,नरेश विरया आदि प्रामुख्यान उपस्थीत होते.



Post a Comment

0 Comments