पत्नीच्या गळ्यावर पतीने केले आरीपटटीचा चाकुने सपासप वार
◾पत्नी श्वेता सरकारी दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत आहे
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : दारुड्या पतीसोबत राहण्यापेक्षा मरण पावलेले बरे असे म्हणणाऱ्या पत्नीच्या गळ्यावर पतीने चाकूने सपासप वार केल्याची घटना मंगळवारी सकाळी येथील गांधी वॉर्डात घडली.
तेव्हा राकेश आरोपी याने तुला आताच मरायचे औषधी आणुन देतो मर असे म्हणुन कोठेतरी निघुन गेला. व काही वेळात पुन्हा येवुन तिचेशी वाद केला. व पत्नीला लाकडी असलेली आरीपटटीचा चाकुने सपासप गळयावर वार करून गंभीर रीत्या जख्मी केले. पोलिसांनी राकेश तुळशीराम चौधरी ( ३६ ) विरुद्ध कलम ३०७, ३०२, २०३ भादंवी. दि. १६ /०८ /२०२२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
राकेश तुळशीराम चौधरी ( ३६ ), रा.बीटीएस प्लॉट, बल्लारपूर असे अटकेतील पतीचे नाव आहे. पत्नी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश चौधरी हा दारू पिऊन पत्नी श्वेताला नेहमीच मारझोड करीत होता. त्यामुळे श्वेता त्याच्यापासून गांधी वॉर्डात विभक्त राहत होती. मंगळवारी राकेश तिथे गेला आणि श्वेताला घरी चलण्याची गळ घातली. यावेळी दोघांत कडाक्याचा वाद झाला. या घटनेत पत्नी गंभीर जख्मी झाली होती. ग्रामिण रुग्णालय बल्लारपूर तपास करून येतून चंद्रपुर रेफर केले. सौ. श्वेता राकेश चौधरी वय अंदाजे ( ३० ) रा. गांधी वार्ड, बल्लारपुर पुढील तपास मा. उमेश पाटील पोलिस निरीक्षक बल्लारपूर, यांचे मार्गदर्शनात सहा.पोलीस निरीक्षक श्री.शैलेंद्र लहुजी ठाकरे तपास करीत आहेत.








0 Comments