3 कोटीच्या अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड सह तिन आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली 24 तासाचे आत अटक





 3  कोटीच्या अपहरण प्रकरणातील मास्टरमाईंड सह तिन आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली 24 तासाचे आत अटक

◾खंडणी करीता शस्त्राचा धाक दाखवून पळवून नेणाऱ्या तिन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : जुगाराचा छंद असलेल्या प्रदीप गांगमवार व राजेश झाडे ह्या मित्रांनी स्वातंत्र्यदिनी जुगार खेळण्यासाठी जाण्याचा बेत आखला. त्यानुसार ते निघाले असता अट्टल गुन्हेगार व सदर दोघांशी नुकतीच मैत्री झालेल्या सरताज हाफिज ह्याने जुगार खेळण्यास सोबत येण्याची इच्छा दाखवुन प्रदिपच्याच कार ने तुकुम परिसरात पोहचल्यावर कार उभी करण्याच्या बहाण्याने थांबले असता चार व्यक्तींनी शस्त्राच्या धाकावर बळजबरीने सर्वांचे अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी प्रदीप ह्याला 3 कोटींची खंडणी मागितली मात्र त्याच्या मित्रांनी 50 लाखांची रक्कम 16 ऑगस्ट रोजी देण्याचे मान्य केल्यामुळे अपहरणकर्त्यांनी त्या तिघांनाही इरई धरण परिसरातुन मुल – सिंदेवाही- उमरेड मार्गे नागपुर येथील मोमिनपुरा भागात नेले.

अपहरणकर्त्यांपैकी एकाला सिगारेट ओढण्याची तलफ आल्याने कार थांबविली दरम्यान संधी साधून राजेश झाडे ह्याने कार मधुन उतरून आरडाओरडा केल्यामुळे अपहरणकर्त्यांचे बिंग फुटले व ते अखेरीस पसार झाले.

मात्र त्यांचे स्वातंत्र्य फार काळ टिकू शकले नाही व चंद्रपूर पोलिसांनी धडक कारवाई करत अवघ्या 24 तासात पाच पैकी तिन आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळविले. पोलीस विभागाकडून प्राप्त माहितीनुसार नागपुर पोलिसांनी सदर प्रकरण दुर्गापूर पोलिसांना वर्ग केले होते. त्यांनतर जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधिर नंदनवार ह्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व दुर्गापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार स्वप्निल धुळे ह्यांच्या नेतृत्वात पथक तयार केले होते. 

सदर प्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात अप. क्र. 136/ 2022 कलम 384,385, 364 (A). 120 (ब), 143, 147, 149 भादवी सहकलम 4. 25 आर्म अक्ट अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू करण्यात आला. सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून मा. पोलीस अधीक्षक सा. यांचे आदेशान्वये पो. निबाळसाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी लागलीच स.पो.नि. बोबडे, स.पो.नि. कापडे, पो.उपनि कावळे यांचे पथक तयार करून आरोपीचे माग घेण्याकरीता मार्गदर्शन करून आदेशीत केले सदर गुन्हयातील आरोपींचा नविन मोबाईल नंबर प्राप्त करून सायबर सेलचे मार्फतीने तांत्रीक तपास करून गुप्त माहितीच्या आधारे घुग्घुस येथील ईसम नामे अमित चमन सारीदेक वय 30 वर्ष रा. घुग्घुस हा आरोपींचे संपर्कात असल्याबाबत माहिती वरून घुग्घुस येथे गेले असता.

 सदर इसमास अधिक विचारपुस करून त्याने यातील तीन आरोपी नामे 1) मोहम्मद सरताज अब्दुल हाफिज वय ( 36 )वर्ष रा. बिनवा गेट रहमतनगर चंद्रपुर 2) शेख नूर शेख ईस्माईल उर्फ रशीद वय ( 38 ) वर्ष रा. नालसाहब रोड मोमिनपुरा नागपुर 3) अजय पुनमलाल गौर वय ( 35 ) वर्ष रा. हसापुरी छोटी खदान नागपुर यांना त्याने घुग्घुस येथील द ग्रेट रेस्टॉरन्ट अँड लॉज येथे मुक्कामी असल्याचे कळल्यावर पोलिसांनी सदर लॉजवर तपासणी केली असता तिन्ही आरोपी क्रेटा गाडी क्र. MH  48 AC  8447 ने पसार झाल्याचे कळताच त्याचा पाठलाग करत असताना सदर वाहन गडचांदूर मार्गे जात असल्याची खात्रीशीर खबर मिळाल्याने पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी नंदनवार चंद्रपुर व उपविभागीय पोलिस अधिकारी नाईक गडचांदूर यांनी सबंधीत पो.स्टे. हद्दीत नाकाबंदी केली. 

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक सदर वाहनाचा पाठलाग करीत जात असता. पो.स्टे. कोरपना ठाणेदार याचे संपर्कात राहून माहिती देत असता सदर वाहन पो.स्टे. कोरपणा हददीत नाकाबंदी दरम्यान अडविण्यात आले व मागेच असलेल्या स्थागुशाचे पथकाने सदर आरोपीताना लागलीच ताब्यात घेऊन यातील वरील तीन्ही आरोपी पकडले सदर गुन्हयातील तीन्ही आरोपी व गुन्हयातील गाडी ताब्यात घेवुन पोस्टे दुर्गापुर यांचे ताब्यात देण्यात आले. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. अरवींद साळवे, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक श्री. शेखर देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात स्था.गु.शा. चे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, पो. उप. नि. अतुल कावळे, पोहवा संजय आतकूलवार, ना. पो. कॉ. संतोष येलपुलवार, पो. कॉ. गोपाल आतंकुलवार, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे यानी केली असुन पुढील तपास पो. स्टे. दुर्गापूर येथील पोलीस अधिकारी हे करीत आहे.



Post a Comment

0 Comments