भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा विद्यार्थी गुणगौरव सोहळा

 













भारतीय जनता युवा मोर्चा द्वारा विद्यार्थी  गुणगौरव सोहळा

◾कठोर परिश्रमातूनच यशाचा मार्ग सुकर - हंसराज अहीर          


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : वणी  येथे गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अविश्रांत परिश्रमातूनच यशाला गवसणी घालता येते. त्यामुळे आजच्या सन्मानाला सार्थ असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनी परिश्रमाची शिकस्त करून यश संपादन केले आहे अशा गुणवंतांच्या बळावरच भविष्यात देशाची महासत्तेच्या दिशेने वाटचाल शक्य होईल असा विश्वास पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यास संबोधित करतांना व्यक्त केला. 


 दि. २२ ऑगस्ट रोजी भाजयुमो वणी शहर च्या वतीने  दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. अहीर व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शिल्ड, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना पुढील शैक्षणिक यशाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार जी, ज्येष्ठ नेते दिनकर पावडे, विजय पिदूरकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, तालुका अध्यक्ष गजानन विधाते, विजय चोरडिया, संजय पिंपळशेंडे, रवी बेलुरकर, श्रीकांत पोटदुखे, किशोर बावणे, नितीन वासेकर, बंडू चांदेकर, संदीप बेसरकर, सत्यजित ठाकूरवार, वैभव कवरासे, शुभम गोटे, शुभम इंगळे, वैभव कळसकर, निखिल काळे, वैभव मांडवकर, प्रदीप बांदूरकर, मोरेश्वर कुत्तरमारे, आकाश मोहाडे, अक्षय देठे, वैभव मेहता, प्रज्वल ठेंगणे यांचेसह आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास पालक, शिक्षकवृंद, शहरातील गणमान्य नागरिक व श्रोता वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.




Post a Comment

0 Comments