बल्लारपुर शहरातील खंडेलवार ज्वेलर्स ऑनलाईन फ्रॉड करून 2 लाख रू ची फसवणूक करणाऱ्या भामट्याला कर्नाटक राज्य बिदर मधून अटक
◾कर्नाटक राज्य येथून बल्लारपूर पोलिसांनी अटक केली; बल्लारपूर पोलिसांची कारवाई
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर शहरातील प्रसिध्द असलेल्या खंडेलवार ज्वेलर्स मधून 24 जानेवारी 2022 ला एक व्यक्ती इंजिनियर असल्याची बतावणी करून लाखो रू च्या दागिन्यांची खरेदी केली मात्र वर्तमान स्थितीत रोख रक्क्म जवळ बाळगणे धोक्याचे असल्यामुळे सद्यस्थितीत ऑनलाईन बँकिंग वर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येतो याच अनुषन्गाने सदर व्यक्तीने ऑनलाईन कॅश ट्रान्सफर करतो म्हणुन बल्लारपुरातील खंडेलवार ज्वेलर्स प्रो. गौरव खंडेलवार यांची फसवणूक केली फसवणूक झाल्याची माहीती होताच संबंधित व्यापाऱ्यांनी लगेच या घटनेची तक्रार बल्लारपूर पोलिसात दाखल केली.
यावरून बल्लारपूर पोलिस स्थानकात 89/2022 भा.द.वि च्या कलम 419, 420 नुसार 24 जानेवारी 2022 ला तक्रार दाखल केली असून यातील आरोपी नामे विशाल राजकुमार निलंगे वय - 27 वर्षे यास बिदर(कर्नाटक) राज्य येथून बल्लारपूर पोलिसांनी अटक केली असून सदर आरोपीचा 25 ऑगस्ट 2022 पर्यंत पीसीआर कस्टडी मध्ये असल्याची माहीती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
या विषयीच्या अधिक माहीती नुसार सदर आरोपी हा बिदर येथील रहिवासी असून तो पुर्ण भारतभर बस, विमान, रेल्वे व भाड्याच्या कारचा वापर करतो तसेच कोणताही गुन्हा करण्यापूर्वी बनावट नावाने सिम कार्ड व मोबाईल ची खरेदी करतो तसेच विशेष करून तो सराफा व्यावसायिकांना तो आपली ओळख आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून सराफा व्यावसायिकाकडून 2 लाख रू पर्यंत सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करतो व पेमेंट ऑनलाईन स्वरूपात सेंड केल्याची बनावट पावती दाखवून फसवणूक करतो.
व दागिने घेवून पसार होतो प्रत्येक वेळी नवीन शहर व नवीन सराफ च्या शोधात असतो विशेष म्हणजे आतापर्यंत सदर आरोपीने चंद्रपुर, भंडारा, लातूर, कर्नाटक मधील रायचूर, मंगलोर, गदग, बंगलोर, ओडिसा मधील संबळपूर, झारसगुडा ई ठिकाणी गुन्हे केल्याची माहीती आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास उमेश पाटील पोलिस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमीझ मुलानी करीत आहेत.













0 Comments