बल्लारपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर
◾अनुसूचित जातीसाठी 10, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आरक्षित
◾सर्वसाधारण महिलासाठी 11, व सर्वसाधारण 11 जागा राखीव
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर नगर परिषदेच्या 2022 मध्ये होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीच्या कार्यक्रम आज दुपारी 12:00 ते 1:00 च्या दरम्यान बल्लारपूर नगर परिषदेच्या मिटिंग सभागृहात पार पडला या सभेला मा. दीप्ती सूर्यवंशी पाटील उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, मा. विजय देवळीकर मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपूर, जयवन्त काटकर उपमुख्याधिकारी बल्लारपूर ई ची उपस्थिती होती.
आज घोषित कऱण्यात आलेल्या आरक्षण सोडतीनुसार बल्लारपूर नगर परिषदेत 17 प्रभाग असणार आहेत यानुसार अनुसूचित जाती करिता 10 जागा यापैकी 5 जागा अनुसूचित जाती महिला करिता राखीव असणार आहे यानुसार प्रभाग 2(अ), प्रभाग7(अ),प्रभाग 8(अ), प्रभाग 10(अ), प्रभाग11(अ) अनुसूचित जाती महिला करिता राखीव असतील तर प्रभाग2(अ), प्रभाग6(अ), प्रभाग14(अ), प्रभाग16(अ), प्रभाग17(अ) अनुसूचित जाती सर्वसाधारण करिता राखीव असतील तसेच अनुसूचित जमाती सर्वसाधारण करिता प्रभाग 12(अ) तर अनुसूचित जमाती महिलाकरिता प्रभाग 13(अ) राखीव असतील, तसेच प्रभाग1(अ), प्रभाग2(ब),प्रभाग4, व 5(अ), प्रभाग6(ब), प्रभाग9(अ), प्रभाग12 व 14(ब), प्रभाग15(अ), प्रभाग16 व 17(ब) अशा 11 जागा सर्वसाधारण महिला करिता राखीव तर ईतर जागा सर्वसाधारण करिता राखीव असणार आहेत या प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या असून अंतिम प्रभाग रचना ही 7 जूलै 2022 ला कऱण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.






0 Comments