भीषण अपघात ; 2 ठार, 3 गंभीर जखमी





भीषण अपघात ; 2 ठार, 3 गंभीर जखमी  

◾ब्रम्हपुरी-वडसा रोड वर विद्यानिकेतन जवळ भीषण अपघात घडला 

चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्याच्या पूर्व टोकावर असलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यात आजची पहाट दुःखदायक स्वरूपात उदयास आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3 वाजताच्या दरम्यान ब्रम्हपुरी-वडसा रोड वर विद्यानिकेतन जवळ भीषण अपघात घडला असून या अपघातात 2 ठार तर 3 गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या विषयीच्या अधिक माहितीनुसार ब्रम्हपुरी -वडसा रोडवर विद्यानिकेतन कॉन्व्हेंट जवळ पहाटे 3 वाजताच्या दरम्यान काही युवक भरधाव वेगाने वाहन चालवीत असतांना त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले व चारचाकी वाहन झाडाला जाऊन धडकले या अपघातात चारचाकी वाहनाचा चुराडा झाला. या अपघातात सनी संजय वाधवाणी 24 वर्ष, शुभम कापगते 28 वर्ष रा. वडसा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सुमित मोटवानी वय 27 वर्ष, सत्य आहुजा वय 27 वर्ष, जोशी 27 वर्ष हे  गंभीर जखमी झाल्याचे वृत्त असून पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहे.

Post a Comment

0 Comments