JST जसवंतसिंग ट्रान्सपोर्ट कंपनी विरुद्ध ओम साईराम वाहतूक ट्रक चालक - मालक वेलफेअर असोसिएशन तर्फे धरणे आंदोलन
◾स्थानिक ट्रक चालक - मालक यांचावर उपास मरीची स्थिती निर्माण
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : WCL वेकोली बल्लारपूर कंपनीचा कोळसा उचल करण्यासाठी DO चा नावाने एकाअधिकार JST ( जसवंतसिंग ट्रान्सपोर्ट कंपनी ) स्थानिक ट्रक चालक - मालक यांचा वर उपास मरीची स्थिती निर्माण करून अत्याचार करत असल्याने JST कंपनी यांचे विरुद्ध असोसिएशन मार्फत JST कंपनी चा गाडी रोको आंदोलन करत आहे.
ओम साईराम वाहतूक ट्रक चालक - मालक वेलफेअर असोसिएशन तर्फे माहिती वा सूचना करिता माननीय जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर, तहसीलदार साहेब बल्लारपूर, पोलीस स्टेशन बल्लारपुर, वेकोली क्षेत्रीय प्रबंधक बल्लारपूर, मा. खासदार, मा. माजी खासदार, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. पालक मंत्री, मा. आमदार बल्लारपूर यांना पत्र पाठवण्यात आले आहे.
ओम साईराम वाहतूक ट्रक चालक मालक वेल्फेअर असोसिएशन, बल्लारपूर सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे कुटुंबातील सर्व व्यवहार ट्रकच्या व्यवसायवर अवलंबून आहे. बल्लारपूर क्षेत्र व इतर क्षेत्रातील कोळसा ट्रान्सपोर्ट वर अवलंबून आहे या असोशियन मध्ये एकूण 200 ट्रक चालक मालक आहेत त्या सर्वांचे जीवन यास व्यवसायवर आहे.
मागील 25 वर्षा पासून बल्लारपूर तसेच इतर सार्वजनिक डब्ल्यूसीएल चे कर्मचारी जे सेवानिवृत्त झाले तसेच इतर नागरिकांनी आपल्या जीवनाची पुंजी लावून या ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करिता ट्रक खरेदी करून या क्षेत्रात काम करत आहेत. तसेच WCL कंपनी च्या कोळसा उचल करण्यासाठी सदर गाड्यांची वापर होत असतो. या असोसियन मार्फतने ट्रक लावण्यात येते व आजपर्यंत डब्ल्यूसीएल कंपनीला आवारातून नियमाप्रमाणे व सर्वांचे सोयीने प्रत्येक DO मध्ये असोसियनच्या गाड्या द्वारे काम सुरक्षित चालू होता.
परंतु तीन - चार दिवसापूर्वी असोसिएशन ला JST ( जसवंतसिंग ट्रान्सपोर्ट कंपनी ) आपला एकाअधिकार चालवण्याचे कोणतीही ट्रकला काम नाही देत असे बोलून नुकसान पोहोचवण्याचे काम करत आहे. स्थानिक ट्रक चालक - मालक यांचा वर उपास मरीची स्थिती निर्माण होत आहेत. या वेळी एड. किशोर पुसलवार यांचे मार्गदर्शनात अध्यक्ष रामचंद्र निषाद, उपाध्यक्ष मनसुर अहमद, सचिव रामनारायण यादव, फुलचंद प्रजापती, प्रशांत दारला, सलीम भाई, रईस पठाण व आमिर खान सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.






0 Comments