चंद्रपूर - मूल मार्गावर ट्रक आणि डिझेल टँकर मध्ये भीषण अपघात 9 होरपळून मृत्यू
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : डिझेल टँकर आणि ट्रक मध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात दोन्ही ट्रक आणि डिझेल टँकर जळून खाक झाल्याची घटना चंद्रपूर - मूल मार्गावर गुरुवारी रात्र 11-00 वाजता दरम्यान घडली.
चंद्रपूर वरून गडचिरोलीकडे डीजल घेऊन जाणाऱ्या आणि लकडा घेऊन जाणाऱ्या ट्रक मध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन्ही ट्रक जळून खाक झाले. झालेल्या अपघातात 2 चालक 7 मजुराचां होरपळून मृत्यू झाला. लाकडांनी भरलेली ट्रक क्र. MH 31 CA 2770 व डिझल टँकर क्र. MH 40 BG 4060 समोरासमोर धडकले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्रीच्या लाकूड भरलेला ट्रक चंद्रपूरच्या दिशेने जात होते तर डिझेल भरलेल्या टँकर चंद्रपूरकडून येत होता. दरम्यान अजयपुरजवळ या दोन्ही वाहनाची धडक होऊन आग लागली. यावेळी एका वाहन लाकूड व दुसरे वाहन डिझेल असल्याने जोरदार भडका उडाला. यावेळी लाकूड असलेल्या वाहनातील चालकसहा मजूर, डिझेल असलेल्या वाहनातील अशा एकूण 9 जणाचा होरपळून मृत्यू झाला.
लाकडे वाहून नेणाऱ्या ट्रक मधील अक्षय सुधाकर डोंगरे ( 30 ) बीटीएस प्लाट बल्लारपूर येथील आहे. तर मजूर प्रशांत मनोहर नगराळे ( 28 ), कालू प्रहलाद टिपले ( 35 ), मैपाल आनंदराव मडचापे ( 24 ), बाळकृष्ण तुकाराम तेलंग ( 40 ), साईनाथ बापूजी कोडापे ( 35 ), संदीप रवींद्र आत्राम ( 22 ), सर्व राहणार बल्लारपूर तालुक्यातील नवी दहेली व कोठारे येथील होते. डिझेल टँकरचालक हाफीस खान ( 38 ) अमरावती, मजूर संजय पाटील ( 35 ), वर्धा असे मृत व्यक्तीचे नावे आहेत.
या अपघातामुळे संपूर्ण रस्ताभर आग पसरल्याने मुल वा चंद्रपूर मार्गावरील वाहतूक खंडित झाली. रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तसेच चंद्रपूर, बल्लारपूर, सीटीपीएस चंद्रपूर, पोंभुर्णा, मुल येथून अग्निशामन वाहन बोलवण्यात आले. आग आटोक्यात आली असली तरी आज सकाळी 10 वाजेपर्यंत टँकर जळतच होता. सकाळीच अग्निशमन गाडीने पुन्हा आग विझवण्यात आली. तपास अधिकाऱ्यानी घटनेचा पंचनामा करून सर्व जळालेल्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठवीण्यात आले आहेत.






0 Comments