22 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृन खून

  






22 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृन खून


चंद्रपुर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहरात अष्टभुजा वार्डातील 22 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृन खून करण्‍यात आला. ही घटना आज बुधवारी उघडकीस आली. धरमवीर यादव उर्फ ​​डब्ल्यू असे खून झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. 

याप्रकरणी संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, धरमवीर याच्यावर दोन भावांच्या खुनाचा आरोप होता. त्या घटनेचा बदला घेण्यासाठी त्याचा खून झाला असावा, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (24 मे ) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी धरमवीर यादव याला फोन करून बोलावले. त्यानंतर रमाबाई नगरातील मंदिराजवळ त्याला गाठून धारधार शस्त्राने वार केले. त्‍याचा जागीच मृत्‍यू झाला. आज ही घटना उघडकिस आली. याबाबत रामनगर पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविला. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.



Post a Comment

0 Comments