श्री सुधिरभाऊ फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे पत्रकार दिनानिमित्त बल्लारपूरातील पत्रकार बांधवांचा सत्कार

 



श्री सुधिरभाऊ फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे पत्रकार दिनानिमित्त बल्लारपूरातील पत्रकार बांधवांचा सत्कार 

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : 6 जानेवारी ला   पत्रकार दिन हा दिवस आपण मराठी पत्रकारितेचे पितामह  "दर्पणकार" आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन आपण साजरा करतो.श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे आपल्या लेखणीने समाज जागृतीचे मौलिक कार्य करणारे, लोकशाहीचे खरेखूरे आधारस्थंभ असणाऱ्या सर्व पत्रकार बंधूना म्हणजेच पत्रकार यांना बल्लारपूर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी श्री. विजय सरनाईक सर यांच्या हस्ते पेन ही भेटवस्तू देऊन श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे  पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. 

 समजहिताच्या कार्यास लोकसमर्थन मिळवून देऊन सातत्याने लोक जागृती करणाऱ्या सर्व पत्रकारांना  अजय दुबे, देवेंद्र आर्या, मनोहर दोतपेल्ली, रमेश निषाद, मुन्ना खेडेकर, वसंत मुन, विकास दुपारे, दिपक भगत, शंकर महाकाली, ज्ञानेन्द्र आर्या, आदींच्या घरी जाऊन पत्रकार दिनानिमित्त त्यांना पेन ही छोटीशी भेटवस्तू देऊन श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यात श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, सामाजिक  कार्यकर्ते निरज झाडे,अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष सलीम नबी अहमद, कमल वर्मा, सुधाकर सिक्का, कैलाश गुप्ता, मानिस रामिला, अनिकेत पोतर्लावार, रिंकू गुप्ता, रोहित टोकल, श्रवण शिवणकर, राहुल प्रतीक बारसागडे, मौला निषाद , हरी बाबु लंका,आदींची उपस्थिती होती.



Post a Comment

0 Comments