कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत - हंसराज अहीर यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
◾सिध्दबली व पौनी-3 प्रकल्पातील प्रश्नांवर 13 जानेवारीला बैठक
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : दि 05 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाद्वारा अंमलात येणाऱ्या उपाययोजना, सिध्दबली कंपनीतील पूर्व कामगारांचे थकीत वेतन व रोजगाराविषयी तसेच वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील पौनी-3 प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक पार पडली. पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज अहीर यांनी या सर्व विषयावर जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला घेवून जिल्हाधिकाऱ्यांशी बैठकीत चर्चा झाली. यावेळी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी जिल्हा प्रशासनाच्या एकंदरीत उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरेानाच्या संकटावार मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे माहिती दिली. तालुका व ग्रामिण स्तरावर हे संकट निस्तारण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना अमलात आणल्या गेल्या असल्याची माहिती दिली. श्री अहीर यांनी जिल्हाप्रशासनाच्या एकंदर तयारी व प्रारंभीक उपाययोजनांवर समाधान व्यक्त केले.
सिध्दबलीतील पूर्व कामगाराना प्रलंबित वेतन व रोजगार द्यावा
बैठकीमध्ये सिध्दबली कंपनीतील पूर्वीच्या 82 कामगारांचे वेतन व अन्य देय राशी तसेच त्यांना पूर्ववत नौकऱ्या बहाल करण्यासंदर्भात चर्चा झाली. हंसराज अहीर यांनी जिल्हा प्रशासन तसेच कंपनी अधिकाऱ्यांच्या चर्चेनुसार संबंधित कामगारांनी कामगार आयुक्तांच्या तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करुनही 10 वर्षापासून प्रकरण प्रलंबित असतांना या बाबतीत निर्णय झालेला नाही असे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले असता येत्या 13 जानेवारी ला वरील सर्व विषयांना घेवून कामगार आयुक्त, जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी, वेकोलि प्रबंधन व सिध्दबली कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी अहीर यांना या चर्चेप्रसंगी दिले
पौनी-3 प्रकल्पातील लक्ष्मी मुक्ती अंतर्गत प्रलंबित नौकऱ्या , अतिक्रमणधारकांना मोबदला
पौनी-3 प्रकल्पातील लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या नौकरींचे प्रस्ताव कायदेशीर बाबींची पूर्तता होऊनही वेकोलिद्वारा हेतूतः प्रलंबित असल्याने हा प्रस्ताव मार्गी लावावा तसेच याच प्रकल्पातील अतिक्रमीत जमिनधारकांच्या मोबदल्याचा प्रलंबित प्रश्न आर.आर. पाॅलिसी 2012 मधील तरतुदीनुसार सोडविण्यात यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घालून वेकोलि प्रबंधनास योग्य निर्देश द्यावेत अशी अहीर यांनी सूचना केली.
सदर बैठकीस ऍड प्रशात घरोटे, विजय आग्रे, विनोद खेवले, उत्तम आमडे, सचिन डोहे व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.


0 Comments