कृषीपंपांचे विज कनेक्‍शन कापण्‍याची मोहीम त्‍वरीत थांबवा अन्‍यथा आंदोलन छेडू – आ. सुधीर मुनगंटीवार

 



कृषीपंपांचे विज कनेक्‍शन कापण्‍याची मोहीम त्‍वरीत थांबवा अन्‍यथा आंदोलन छेडू – आ. सुधीर मुनगंटीवार

◾विधानसभेत राज्‍य सरकारने दिलेल्‍या आश्‍वासनाला महावितरणने फासला हरताळ 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभेच्‍या हिवाळी अधिवेशनात राज्‍य शासनाने शेतक-यांच्‍या कृषीपंपांचे विज कनेक्‍शन कापणार नाही अशी ग्‍वाही उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्‍या सार्वभौम व पवित्र सभागृहात दिली. मात्र महावितरण तर्फे राज्‍य शासनाने दिलेल्‍या आश्‍वासनाला हरताळ फासला जात आहे. चंद्रपूर जिल्‍हयात पोंभुर्णा, मुल या तालुक्‍यात शेतक-यांच्‍या कृषी पंपांचे विज कनेक्‍शन कापल्‍याच्‍या तक्रारी शेतक-यांकडून प्राप्‍त झाले आहे. हा विधानसभेच्‍या पवित्र सभागृहाचा अवमान आहे. शासनाने त्‍वरीत महावितरणला कृषीपंपांचे विज कनेक्‍शन न कापण्‍याबाबत निर्देश द्यावे, अन्‍यथा आम्‍ही शेतक-यांसह आंदोलन छेडू असा ईशारा विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. 

राज्‍यात नैसर्गीक आपत्‍तीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आर्थीक विवंचना व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्‍महत्‍या करीत आहे. अशा परिस्‍थीतीत शेतक-याला मदतीचा हात देणे हे शासनाचे कर्तव्‍य आहे. या संदर्भात नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभेच्‍या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली थकित विजबिलापोटी शेतक-यांच्‍या कृषीपंपांचे विज कनेक्‍शन कापणार नाही, असे आश्‍वासन राज्‍य सरकारतर्फे देण्‍यात आले. मात्र राज्‍य सरकारने विधानसभेच्‍या पवित्र व्‍यासपिठावर दिलेल्‍या या आश्‍वासनाला महावितरणने हरताळ फासला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. शेतक-यांच्‍या व्‍यथा, वेदनांशी राज्‍य सरकारला काहीही देणेघेणे नाही हे यावरून स्‍पष्‍ट होते. सरकारने तातडीने कृषीपंपांचे विज कनेक्‍शन कापण्‍याची ही मोहीम त्‍वरीत थांबवावी अन्‍यथा तिव्र आंदोलन छेडण्‍याचा ईशारा आ. मुनगंटीवार यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments