रस्त्यावरील खड्डे चुकविताना झालेल्या अपघातामुळे लालपेठ येथील युवकाचा मृत्यू
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहरातील बाबूपेठ व लालपेठ परिसर हा दलित वस्ती म्हणून ओळखला जातो जवळपास मागील ४ वर्षांपासून या परिसरातील एकही रस्ते व्यवस्थित न बनल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे येत्या काही दिवसात महानगरपालिका निवडणूक पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर अंचलेश्वर गेट ते बागला चौक पर्यंतच्या रस्त्याचं डाम्बरीकरणं करण्यात आले मात्र बागला चौक ते लालपेठ रस्ता अजूनही तसाच आहे व यामुळेच की काय एका ३० वर्षीय युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे २ जानेवारी २०२२ च्या रात्री १०:३० वाजताच्या सुमारास नांदगाव येथील मायनस क्वार्टर येथे राहणारे राहुल ओमप्रकाश नायक वय-३० वर्ष हा आपल्या दुचाकीने आपल्या घराकडे परतत असताना रस्त्यावरील खड्डे चुकविताना वाहणावरून त्याचा तोल गेला व वाहन रस्ता दुभाजकावर आदळले व त्यामुळे घटनास्थळी च राहुलचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला.


0 Comments