चंद्रपूर महानगपालिकेचे नवे आयुक्त म्हणून विपीन पालिवाल( मुद्दा ) यांची नियुक्ती
- राजेश मोहिते यांची बदली
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून विपीन पालिवाल( मुद्दा ) यांच्या नियुक्तीचे आदेश सोमवारी ३ जानेवारीला नगर विकास विभागाने जारी केले आहेत. या संदर्भात जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ३६ नुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका या पदावर विपीन पालिवाल यांची प्रशासकीय कारनास्तव नेमणूक करण्यात येत आहेत.
असे उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे चंद्रपूरचे तत्कालीन आयुक्त राजेश मोहिते हे वैद्यकीय कारणामुळे रजेवर गेले असल्यामुळे त्यांची पदस्थापणा मंत्रालय मुंबईत करण्यात आली आहे. नुकतेच कार्यालयात गैरहजर असण्याच्या कारणावरून महापौर यांनी आयुक्त मोहिते यांची नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. विपीन पालिवाल ( मुद्दा ) हे २३ जून २०२१ पासून चंद्रपूर मनपात अतिरिक्त आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी कामठी नगर परिषद, बल्लारपूर नगर परिषद, व वर्धा नगर परिषद येथे मुख्याधिकारी म्हणून कार्य केले आहेत.


0 Comments