अस्वलाच्या हल्ल्यात मजूर जखमी
◾वेळेवर उपचार मिळाल्याने मजुरांची प्रकृती स्थिर
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर तालुका हा वनाने नटलेला आहे या तालुक्यात विविध प्रकारचे वन्यप्राणी आढळून येतात निसर्गात सर्व जीव सृष्टीना महत्व असले तरी मानवाने वनावर अतिक्रमण केले असल्यामुळे सद्यस्थितीत वन्यजीव-मानव संघर्षात वाढ झाली आहे. बल्लारपूर तालुक्यातील ग्रा.पं. किन्ही येथे म.ग्रा.रो.ह.यो. अतंर्गत बोडी खोलीकरण ( अनुसया सुरेश नैताम किन्ही ) यांच्या शेतात दि.०४ जानेवारीला बोडी खोलीकरण चे कामावरुन सुट्टी झाल्यानंतर दुपारी ३ ते ३:३० च्या दरम्यान प्रकाश अलाम किन्ही हा मजुर कामाच्या ठिकाणी बाजूला शौचासाठी गेले असता अस्वल ने त्यांच्यावर झडप घातली, त्यात मजुर जखमी झाला, त्याला बल्लारपुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपुर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. यासंबंधीचा वनविभाग आणि पोलिस संयुक्त चौकशी करीत आहेत.


0 Comments