पोंभूर्ना येथे वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

 



पोंभूर्ना येथे वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू 

◾ तीचे सकाळी फिरायला जाणे ठरले शेवटचेच

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : मागील महिना दोन महिन्यांच्या काळात मानव-वन्यजीव संघर्षात वाढ झाली असून एकेकाळी वाघांचा जिल्हा व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणून एक वैभव म्हणून उदयास आलेला चंद्रपूर जिल्हा सद्यस्थितीत वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडत आहे मागील काही दिवसांपूर्वी बल्लारपूर, चिमूर व अन्य काही तालुक्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतांनाच आज सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूंना तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संध्या विलास बावणे वय-३५ असे मृत महिलेचे नाव असून सदर महिला ही वेळवा गावात राहणारी असून सदर महिला या गावाच्या मार्गावर फिरत असताना अचानक वाघाने हल्ला केल्याचे वृत्त आहे विश्वसनीय सूत्राच्या महिला ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती असून वाघाच्या हल्ला झाल्यावर याच मार्गावर सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा करून वाघाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सदर महिलेचा मृत्यू झाला होता. या दरम्यान वाघाने हल्ला करून जंगलाच्या दिशेने सुसाट वेगाने पळाला. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास वनविभाग व पोलीस विभाग संयुक्तपणे करीत आहे.


Post a Comment

0 Comments