आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्याकडून ३५ हजारांची खंडणी घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नयन साखरेला रंगेहात पकडले : सायबर सेलची कारवाई !
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर सचिव नयन साखरे हा मोबाईल द्वारे चित्रीकरण करून अधिकाऱ्यांना वारंवार पैशाची मागणी करीत असल्या प्रकरणी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केलेल्या तक्रारीवरून सायबर सेलच्या पोलिसांनी शुक्रवारी दुपारी साखरे यांना 35 हजार रुपयांची खंडणी घेताना रंगेहात पकडले . रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती . दरम्यान या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. नयन साखरे हा मागील काही दिवसापासून सतत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात जाऊन मोबाईल चित्रिकरण करत होता . त्यानंतर अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे सतत पैशाची मागणी करीत होता .” सर सलामत तो पगार पचास हजार ” हा त्याच्या अधिकाऱ्यांशी बोलताना फेमस डायलॉग होता .दर महिने पन्नास हजार रुपये द्या अशी त्यांने मागणी केली होती . चार दिवसापूर्वी नयन साखरे विरुद्ध उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे तक्रार केली होती .या तक्रारीचा तपास सुरू होता . दरम्यान(५०) पन्नास हजार रुपयांवरून (35) हजारात सेटलमेंट झाले . शुक्रवारी दुपारी 35 हजार रुपयांची खंडणी घेत असताना पोलिसांनी रंगेहात पकडले . उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी हा तपास सायबर सेलकडे दिला होता . या दरम्यान भ्रमणध्वनीवर झालेले संभाषण ही मिळविण्यात आले होते . शुक्रवारी ही घटना घडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होते . त्यामुळे कारवाईची उर्वरित माहिती मिळू शकली नाही . या कारवाईमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात खळबळ उडाली आहे.


0 Comments