अंचलेश्वर गेट ते बागला चौकपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे महापौरांच्या हस्ते झाले भूमिपूजन
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : अंचलेश्वर गेट ते बागला चौकपर्यंत डांबरीकरण रस्ता बांधकामाचे भूमिपूजन महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 10 डिसेंबर रोजी पार पडले.
चंद्रपूर महानगरपालिका, चंद्रपूरच्या नागरी अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना निधीअंतर्गत १ कोटी ७० लख ५० हजार किमतीचे अंचलेश्वर गेट ते बागला चौकपर्यंत डांबरीकरण रस्ता विकसीत करण्यात येणार आहे. या बांधकामाचे भूमिपूजन शुक्रवारी महापौरांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, सभागृह नेता देवानंद वाढई, महिला व बालकल्याण समिती उपसभापती शीतल कुडमेथे, प्रभागातील नगरसेविका कल्पना लहामगे, नगरसेवक निलेश खोबरागडे, नगरसेविका अनुराधा हजारे, नगरसेवक संजय कंचर्लावार, नगरसेविका शीतल आत्राम, नगरसेविका माया उईके, नगरसेविका कल्पना बगूलकर, नगरसेविका शीला चव्हाण, नगरसेविका वंदना तिखे, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेवक प्रशांत चौधरी, भाजपचे नेते प्रकाश धारणे, विठ्ठल डुकरे, अरुण तिखे, प्रज्वलंत कडू आदींची उपस्थिती होती.


0 Comments