डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपुर जिल्हाच्या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांनी लवकरात लवकर आवेदन पाठवावे

 


डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपुर जिल्हाच्या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्यांनी लवकरात लवकर आवेदन पाठवावे

◾डीजीटल मिडीया असोसिएशन चे आवाहन 

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : पत्रकार दिनाचे डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल साठी एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये विजेते होणाऱ्यांना प्रथम व द्वितीय स्तराचे पुरस्कार देण्यात येत आहे. ही स्पर्धा संपूर्ण जिल्ह्यात न्यूज पोर्टल व यूट्यूब चैनल यांच्यासाठी आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर आपले आवेदन पाठवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत स्पर्धेमध्ये निर्धारित विषयाशी संलग्नित वृत्तांनाचं या स्पर्धेत समाविष्ट करण्यात येणार आहे. यांची नोंद स्पर्धकांनी घ्यावी.

विषय :- 

(१) चंद्रपूर जिल्ह्यामधील मूळ समस्यांवर आपले वृत्त. 

(२) यशोगाथा किंवा व्यक्तिविशेष 

(३) वन्यप्राण्यांच्या हमला : समस्या व समाधान 

या तीन विषयांवर प्रकाशित वृत्त स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 22 नोव्हेंबर 2021 पासून ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत एक दिवसांमध्ये प्रकाशित वृत्तांना प्राधान्य दिले जाईल. तीन वेगवेगळ्या विषयांवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून वरील विषयावर वृत्त प्रकाशित करणाऱ्यांना प्रथम पारितोषिक रोख रक्कम  प्रथम, रक्कम द्वितीय, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची निवड करण्यासाठी एक परीक्षक मंडळ नेमण्यात येणार असून परीक्षक मंडळाचा निर्णय हा अंतिम राहणार आहे. डिजिटल मीडियाशी संबंधित प्रत्येकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

स्पर्धकांनी 

जितेंद्र चोरडीया:- 9823168960, 

विजय सिद्धांतावर:- 7522220273, 

जितेंद्र जोगड:- 9822220273  

राजू बिट्टूरवार 8149948172 या WhatsApp नंबरवर (स्पर्धेसाठी वृत्त) असे लिहून आपले वृत्त पाठवावे.

Post a Comment

0 Comments