यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : महामानव, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कार्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या बहुजन समाज शहर संघटिका विमल काटकर, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, वैशाली रामटेके, वैशाली मेश्राम, वंदना वाघमारे, वैशाली रत्नपारखी, निलीमा पोरेकर, छाया निमगडे, संघमीत्रा काटकर, कल्याणी चंद्रागडे, राजश्री काटकर, पूनम खोब्रागडे, छबीता खोब्रागडे, आशा चांदेकर, सुहाणी खोब्रागडे, रुपाली मेश्राम, आशा देशमूख, अनिता झाडे, वैशाली मद्दीवार, सुजाता बल्ली, कल्पना शिंदे, दर्शना चापले, शांता धांडे, लिलाबाई जूनघरे, बालजा चंद्रागडे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करुन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी संविधानिक हक्कांबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


0 Comments