९ वर्षांनंतर मिळाला कुत्र्याच्या मालकाला न्याय

 


९ वर्षांनंतर मिळाला कुत्र्याच्या मालकाला न्याय  

◾चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलीच घटना ज्यात कुत्र्याच्या मालकाला न्यायालयाने दिला न्याय व ३ लाखांची भरपाई

चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्मिळ घटना म्हणजे ज्यात एका कुत्र्याच्या मालकाला न्यायालयाने तब्बल ९ वर्षांनंतर न्याय देताना ३ लाख रु ची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहे. या संदर्भातील अधिक माहितीनुसार चंद्रपुरातील ओंकार नगर येथील रहिवासी असलेले उमेश भटकर १० जानेवारी २०१३ ला आपल्या ११ वर्षीय कुत्रा(जॉन) ला सकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान अय्यपा मंदिर परिसरात फिरवीत असतांना गोपाल दूध डेअरी जवळ मेसर्स रहीम ट्रॅव्हल्स ची  स्कूल बस क्रमांक एमएच ४० एन ३७६६ ने धक्का दिला  या धडकेत कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली असता शवविच्छेदन अहवालात कुत्र्याची अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले विशेष म्हणजे सदर घटना घडण्यापूर्वी कुत्रा हा आरती इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काम करीत होता व त्याबदल्यात मालकाला प्रतिमहिना ८ हजार रु मिळत  होते कुत्रा हा स्कूल बसच्या लापरवाई ने मरण पावला त्यामुळे आमचे ८ हजार रु प्रति महिना नुकसान होत आहे त्यामुळं नुकसानभरपाई मिळण्यात यावी याला अनुसरून ट्रिब्युनल न्यायालयाने निर्देश देताना गैरअर्जदाराला १,६२,०००/- चे साडे ८ वर्षांचा ८% व्याज दराने जवळपास ३ लाख रुपयाची भरपाई मिळू शकते कुत्र्याच्या मालकाकडून एड.जयप्रकाश पांडे तर इन्श्युरन्स कम्पनी कडून अभय कल्लूरवार, व बसमालका कडून एड.एन.एस.सूर यांनी आपली बाजू मांडली.



Post a Comment

0 Comments