चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर वन्यप्राण्यांचा हैदोस : बल्लारपूर,विसापूर टोल-प्लाझा जवळ मधाचे पोळ खाण्याच्या उद्देशाने अस्वल चढले झाडावर
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर वन्यप्राण्यांच्या हैदोस दिसून येत आहे की काय मागील काही दिवसांपूर्वी पॉवर हाऊस परिसरात एका बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका निष्पाप पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता तर नुकतीच २ दिवसापूर्वी चंद्रपूर शहराजवळील बल्लारपूर मार्गावर टोल प्लाझा जवळ एका अस्वलाच्या मुक्त संचार दिसून आला होता विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार विसापूर टोल नाक्याजवळ अनेक मधमाशांचे पोळ आहेत व हेच पोळ चाखण्याच्या दृष्टीने अस्वल त्या ठिकाणी आले असेल नेमकं अस्वल ज्यावेळी आलं असेल त्या वेळेस रहदारी सुरू असल्यामुळं नागरिकांनी मुक्त अस्वलाचा संचार दिसून आल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलेय आहे. या संदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता लवकरच वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करण्यात येईल तसेच वन्य जीवांना जंगलात पिटाळून लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे स्पष्ट केले.


0 Comments