चंद्रपुरात पुन्हा दारूबंदी होईल का? मुंबई उच्च न्यायालयात दारूबंदी संदर्भात ४ याचिका दाखल
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूरमधील दारूबंदी उठवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे डॉ.अभय बंग यांच्यासह अन्य ४ सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यासंबंधी चार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. याचिकांवर मुंबईतील खंडपीठासमोर सुनावणी होऊ शकते की नागपूर खंडपीठासमोर, याविषयी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता प्रशासकीय पातळीवर निर्णय घेणार आहेत. त्यामुळे चंद्रपूरमधील उठलेली दारुबंदी पुन्हा लागणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान मोठ्या लढ्यानंतर चंद्रपूरमध्ये महिलांनी दारूबंदी करण्यात यश मिळविले होते. परंतु राज्य सरकारने चंद्रपूर येथील दारू बंदी उठविल्याचे पडसाद उमटले होते. राज्यातील चंद्रपूर येथे असलेली दारूबंदी राज्य सरकारने उठवल्यानंतर राज्य सरकारचा निषेध करीत संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदीसह महिला युवा मोर्चा तर्फे राज्य सरकारचा निषेध करण्यात आला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी ६ वर्षांनी उठवली होती. त्याचा असीम आनंद व्यावसायिकांना झाला होता आणि त्या संबंधीचा एका व्हिडिओ व्हायरल देखील झाला होता. दारुबंदी उठविणाऱ्या पालकमंत्र्याच्या फोटोची पूजा केली जात असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


0 Comments