बल्लारपूर कारवा पर्यटनाच्या दुसऱ्याच दिवशी घडले वन्यप्राण्यांचे दर्शन !
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील प्रादेशिक वनविभागाच्या माध्यमातून कारवा ( बल्लारपूर ) वनविभाग परिसरात वन सफारी पर्यटन दि.२५ डिसेंम्बर २०२१ पासून सुरू करण्यात आले. मात्र वन सफारी पर्यटनाच्या दुसऱ्याच दिवशी पर्यटकांना वन्यप्राण्यांचे दर्शन घडल्याचे वृत्त आहे याविषयीच्या अधिक माहितीनुसार काल २६ डिसेंम्बर २०२१ ला सकाळी ६:०० ते १०:०० वाजताच्या दरम्यान वन पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना कारवा वन पर्यटन क्षेत्रात वन्यप्राण्यांचे दर्शन घडले विशेष म्हणजे वाघ, हरीण, चितळ, राणकुत्रं, रानगवे दिसल्याची माहिती आहे तसेच याच दरम्यान विविधरंगी पक्षी दिसल्याची ही माहिती आहे. जिथे मागील काही दिवसात वन्यजीव-मानव संघर्षात वाढ होत असताना दिसत आहे त्याच ठिकाणी वनपर्यटनाच्या दृष्टीने वन्यजीवांचे पर्यटकांना दुर्लभ अशा वन्य प्राण्यांचे दर्शन घडले आहे. विशेष म्हणजे वनपर्यटनाच्या दुसऱ्याच दिवशी वन्यप्राण्यांच्या दर्शन घडल्यामुळे वनविभागाचा वन सफारी पर्यटन सुरू करण्याचा उद्देश सफल झाला असे मत मा.संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर यांनी व्यक्त केले.


0 Comments