28 डिसेंबर रोजी पत्रकार संघाचे ठाणे येथे राज्यस्तरीय 16 वे अधिवेशन महाराष्ट्रातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - वसंत मुंडे
◾महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर.
◾अधिवेशनाला येताना सर्वांनी कोव्हीड 19 लस घेतल्याचे प्रमाणपत्र बरोबर घेऊन यावे - आरोटे
मुंबई ( राज्य रिपोर्टर ) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सोळावे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथील गडकरी रंगायतन सभागृहात मंगळवार दिनांक 28 डिसेंबर रोजी होणार आहे. या राज्यस्तरीय अधिवेशातील राज्यस्तरीय या वर्षीचे पुरस्कार नुकतेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे. व राज्य संघटक संजय भोकरे यांचे आदेशानुसार पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी काल ठाणें येथे जाहीर केले यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार पारसनाथ राय यांना तर ठाणे ग्लोबल पुरस्कार जितेंद्र भाई मेहता . तर या वर्षीचा कोरोना योध्दा राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष निळकंठ मोहीते व सचिव सागर शिंदे. तर समाजभूषण डॉक्टर स्वामी शिरकुल वैदु . समाज भूषण पुरस्कार संजय तरे. विशेष पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कैलास म्हापदी. रेश्मा साळुंखे मिलिंद बल्लाळ. स्वर्गीय दत्ताजी धानोरकर ज्येष्ठ नाट्यनिर्माते पुरस्कार महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या आदिवासी भागातील कळसुबाई शिखर पर्वत रांगांमध्ये वसलेल्या आदिवासी भागात आरोग्य दुत डॉ. बाबासाहेब गोडगे. सामाजिक कार्यक्षेत्रातील पुरस्कार राजेंद्र खारकर. मराठी उद्योजक भूषण पुरस्कार ओमकार माळी.. संगीत व कलारत्न क्षेत्रातील पुरस्कार शेखर सुपकर. प्रशासकीय भूषण पुरस्कार तरुलता धानके शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार दिलीप थोरवे व भीमाशंकर तोरमल. सामाजिक जितेंद्र पाटील दीपक म्हात्रे. समता वाकडे प्रशासकीय भालचंद्र घुगे साहित्य प्रशांत देशमुख क्रीडा मिलिंद पूर्णपत्रे शशिकांत नाईक. कलाक्षेत्रातील सुनिल मोरे. तर सांस्कृतिक विभागाचा राज्यस्तरीय पुरस्कार अक्षय मालवणकर यांना जाहीर करण्यात आला आहे तरी हा पुरस्कार सोहळा 28 डिसेंबर 20121 रोजी दुपारी 3 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे तर प्रथम सत्र मध्ये राज्य भरातील ज्या पदाधिकाऱ्यांनी अहवाल सर्वात उत्कृष्ट कार्य केले त्या विभागीय अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष यांचा विशेष सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक पत्रकारांनी आपला सहभाग उस्फूर्तपणे नोंदवावा असे आवाहन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे . राज्य संघटक संजय भोकरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सोळावे राज्यस्तरीय अधिवेशन दरवर्षीप्रमाणे यावर्षी ठाणे येथील रंगायतन सभाग्रहात मंगळवार दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे.या राज्यस्तरीय अधिवेशनाला नामवंत पत्रकार उपस्थित राहणार असून मान्यवरांची देखील उपस्थिती लाभणार आहे. या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणाऱ्या पत्रकार संघाच्या सभासदांना पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारे साहित्य अधिवेशन स्थळी देण्यात येणार आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकारी, विभाग स्तरावरील प्रमुख पदाधिकारी, जिल्हा, शहर, तालुका स्तरावरील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकार संघाचे सर्व सभासद बांधव भगिनींनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्याच बरोबर पत्रकार संघाच्या या सोळाव्या राज्यस्तरीय अधिवेशनाला महाराष्ट्रातील सर्व पत्रकार, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियाचे विविध विभागातील प्रतिनिधी आणि पत्रकार प्रेमी सुजान नागरिकांनी या अधिवेशनाला उपस्थित राहून या स्तुत्य उपक्रमास ऐतिहासिक स्वरूप द्यावे असे आवाहन पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे सरचिटणीस विश्वास आरोटे . प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव.कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे.कोकण विभागीय सचिव किशोर पाटील यांनी केले आहे. तर राज्यभरातील येणाऱ्या सर्व पत्रकारांनी सोबत दोन लसीचे दोष येते असेल त्याचे प्रमाणपत्र बरोबर घेऊन यावे शासनाने दिलेल्या नियमावलीप्रमाणे सर्व नियमांचे पालन करून या अधिवेशनामध्ये राज्यभरातील येणाऱ्या पत्रकार व नागरिकांनी येत असतांना सर्व नियमांचे पालन करावे असे आव्हान देखील राज्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.


0 Comments