२६ जानेवारी पर्यंत लसीकरणाचा दुसरा डोज पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या सूचना
बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : २६ जानेवारी २०२२ पर्यंत दुसरा डोस १०० टक्के पूर्ण करावे जिल्हाधिकारी यांच्या सूचना आज दिनांक ३० डिसेंबर २०२१ ला मा. श्री अजय गुल्हाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली बल्लारपूर तालुक्यातील सर्व covid19 चे संबंधित अधिकारी यांची सभा उपविभागीय अधिकारी बल्लारपूर यांच्या कार्यालयात पार पडली. या सभेत मा. अजय गुल्हाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी बल्लारपूर तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील covid 19 लसीकरणाचा बाबत सविस्तर आढावा घेतला. शहरातील लसीकरणा बाबत डॉ. श्री गजानन मेश्राम वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच ग्रामीण भागातील covid19 लसीकरणाचा दुसरा डोस १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन या बाबत सविस्तर माहिती डॉ. श्री सुधीर मेश्राम तालुका आरोग्य अधिकारी बल्लारपूर यांनी दिली. दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून वय १५ ते १८ वर्षापर्यंत च्या मुलांना covid १९ लसीकरण सुरू करण्याच्या संबंधात आढावा मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी घेतला. Omicron या कोरोना च्या नवीन व्हेरियंटचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि आरटीपीसीआर टेस्ट वाढविण्याच्या सूचनाही मा. जिल्हाधिकारी यांनी केल्या.
या सभेस श्रीमती दीप्ती सुर्यवंशी उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, श्री. संजय राईंचवार तहसीलदार बल्लारपूर, श्री. जयवंत काटकर सहा मुख्याधिकारी बल्लारपूर, श्री. उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर, सर्व नोडल अधिकारी तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती, श्री. लहामगे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.


0 Comments