पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 4 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता सावली येथे आगमन व सावली येथे नगरपंचायत निवडणूक संदर्भाने पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा. दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. दुपारी 1.30 वाजता सिंदेवाही येथे आगमन व नगरपंचायत निवडणूक संदर्भाने पदाधिकारी यांच्यासमवेत चर्चा. दुपारी 3 वाजता सिंदेवाही येथून नागपूरकडे प्रयाण.
सोमवार, दि. 6 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 10.45 वाजता ओमायक्रॉन संदर्भाने करावयाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक. सकाळी 11.30 वाजता ताडोबा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोहर्ली-कोलारा-पांगरी येथे पर्यटकाकरिता फॅसिलिटेशन सेंटर तयार करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक. दुपारी 12.15 वाजता चरखा संघ सावलीच्या वतीने खादीचे कपडे विक्री करण्यासाठी मोहर्ली व कोलारा गेटवर विक्री केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्धतेबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक. दुपारी 1 वाजता चंद्रपूर शहरातील इरई नदीचे सौंदर्यीकरण व पर्यावरण संरक्षण संदर्भाने जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक. दुपारी 2 ते 2.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव.
दुपारी 2.30 वाजता सावली तालुक्यातील आसोलामेंढा प्रकल्प व चंद्रपूर येथील वढा तीर्थक्षेत्र या दोन्ही परिसरातील पर्यटकांच्या दृष्टिकोनातून विकास करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक. दुपारी 3.15 वाजता चंद्रपूर शहरातील वाढते वायू प्रदूषणावर उपाययोजना करण्याच्या संदर्भाने संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक. सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात खनिज विकास प्रतिष्ठान समितीची बैठक. सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.


0 Comments