तहसीलदार २५ हजार रुपयांची लाच घेताना अटक

  


तहसीलदार २५ हजार रुपयांची लाच घेताना अटक 

◾लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यवाही  

भद्रावती ( राज्य रिपोर्टर ) : भद्रावती शहर हे ऐतिहासिक दृष्टया महत्वाचे शहर म्हणून ओळखले जाते हिंदू,बौध्द व जैन धर्माचा जणूकाही संगमच या शहरात होते की काय असे चित्र दिसून येतं मात्र सद्यस्थितीत वेगळ्याच चर्चेने या शहरात उधाण आलंय नुकत्याच हाती आलेल्या विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार भद्रावती येथील तहसीलदार असलेल्या डॉ.निलेश खटके यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ हजार रुपयांची लाच घेतल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.

 जवळपास २ महिन्यांपूर्वी भद्रावती शहरात तहसीलदार म्हणून रुजू झालेले डॉ.निलेश खटके यांनी विटा भट्टीसाठी लागणाऱ्या लाल मातीच्या उत्खननाची परवानगी देण्यासाठी या अधिकाऱ्याने फिर्यादीला तब्बल २५ हजार रुपयांची लाच मागितली मात्र लाच द्यायची इच्छा नसल्यामुळे फिर्यादीने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली. या तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भद्रावती तहसील कार्यालय परिसरात सापळा रचून कारवाई केली असता डॉ.निलेश खटके हे संबंधिताकडून २५ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात अटक केली २ महिन्यांपूर्वी पोंभुर्णा येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना सुध्दा सातबारा फेरफार व इतर प्रकरणात शेतकऱ्यांकडून पैसे घेतले असल्याची तक्रार सुद्धा उपविभागीय अधिकारी, गोंडपीपरी यांच्या कडे दाखल असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे डॉ.निलेश खटके यांची भद्रावती शहरात बदली झाल्यानंतर एक महिना होत नाही तोच सदर प्रकरण घडले या प्रकारामुळे मात्र महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments