नगर पंचायत / परिषद व ग्रामपंचायत पोटनिवडणूक-2021
◾मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई
चंद्रपूर ( राज्य रिपोर्टर ) : चंद्रपूर जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतीमध्ये 21 डिसेंबर रोजी पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत. निवडणूक असलेल्या क्षेत्रात मतदानाचे दिवशी कोरडा दिवस म्हणून जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) अन्वये तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने निवडणूक असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदानाच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात येत असून या कालावधीत कोरडा दिवस पाळण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत.
सावली,पोंभूर्णा,गोंडपिंपरी,को
नगरपरिषद नागभीड तर नगरपंचायत सावली,पोंभुर्णा,गोंडपिपरी,को
तालुकानिहाय निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींची यादी :
गोंडपिपरी तालुक्यातील परसोडी, कुडेसावली व विहीरगांव, वरोरा तालुक्यातील सोनेगाव, बोरगाव मो., खापरी, बल्लारपूर तालुक्यातील गिलबिली, कोरपना तालुक्यातील अंतरगाव, चिमूर तालुक्यातील पिंपळगाव,येरखेडा, भद्रावती तालुक्यातील बिजोनी, राजुरा तालुक्यातील रामपूर, सिंधी, सुमठाणा, विरुर स्टेशन व सास्ती, मूल तालुक्यातील चिरोली, ब्रह्मपुरी तालुक्यातील चोरटी, कोसंबी खडसमारा, खरकाडा व मेंडकी, जिवती तालुक्यातील लांबोरी व नंदप्पा, नागभीड तालुक्यातील येनोली माल, कोथुळना व सोनोली बुज या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहे.


0 Comments